vehicles carrying stuff esakal
नाशिक

Nashik Traffic Rules Break: वाहनांतून धोकादायकरित्या सामानाची वाहतूक! वाहतूक पोलिसांचे दूर्लक्ष; भीषण दूर्घटनेची शक्यता

Nashik News : प्रवासी वाहन असलेल्या रिक्षा आणि दुचाकीवरूनही अनेकवेळा अतिशय धोकादायकरित्या वस्तू वा सामानाची वाहतूक केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Rules Break : साहित्य, सामान वाहतूक करण्यासाठी मालवाहू वाहने असतानाही, बहुतांशी वेळा अशा वाहनातून अत्यंत धोकादायकरित्या सामानाची वाहतूक केली जाते. एवढेच नव्हे तर, प्रवासी वाहन असलेल्या रिक्षा आणि दुचाकीवरूनही अनेकवेळा अतिशय धोकादायकरित्या वस्तू वा सामानाची वाहतूक केली जाते.

यामुळे वाहनचालक स्वत:सह दुसर्याचाही जीव धोक्यात टाकत असतो. परंतु अशा बेकायदेशीर वाहतुकीकडे पोलीस अंमलदारांकडूनही सोयीस्कररित्या दूर्लक्ष होत असल्याने अशा चालकांचे फावते. मात्र, यामुळे भविष्यात एखादी भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. (Nashik Transportation of goods dangerously by vehicles)

शहरात वाहनचालक अत्यंत धोकादायकरित्या वाहने चालवितात. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते आहे. वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवितात. वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. मात्र यात आणखी भर पडत आहे ती बेशिस्तपणे आणि बेकायदेशीररित्या प्रवासी वाहनातून सामान, साहित्याची वाहतूक करीत दुसर्यांच्या जीवाला धोका उत्पन्न केला जातो आहे.

मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जादा सामान टाकले जाते. बऱ्याचदा त्यात असलेल्या सामानामुळे अन्य वाहनांनाही धोका पोहोचण्याची शक्यता असते. तसेच, बहुतांशी वेळा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा वापर सामान वाहतूकीसाठी केला जातो. रिक्षातूनही अतिशय धोकादायक रित्या साहित्य, सामानाची वाहतूक करून दुसऱ्याच्या जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. (latest marathi news)

या साऱ्या प्रकाराकडे मात्र वाहतूक पोलीसांकडून सोयीस्कररित्या दूर्लक्ष केले जाते. शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकांमध्ये वाहतूक पोलिस नियुक्तीला असताना, त्यांच्यासमोर अशी वाहने धोकादायकरित्या सामानाची वाहतूक करतात. यामुळे रस्त्यामध्ये अपघाताची शक्यता असतानाही पोलिसांकडून या वाहनचालकांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.

दुचाकीवरूनही वाहतूक

दुचाकी वाहन हे काही मालवाहू वाहन नाही. ट्रीपलपेक्षा अधिक सीट बसवून धोकादायक रित्या दुचाकी प्रवास केला जाणे हे नवीन नाही. परंतु तरीही बऱ्याचदा दुचाकी चालकाकडून अत्यंत धोकादायक रित्या सामानाची वाहतूक केली जाते. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या शिड्या, पीव्हीसी पाईप तर कधी लोखंडी पाईप यासह काच, साहित्यांचे बॉक्स असे एक ना अनेक प्रकारचे साहित्य-सामान चालकांकडून दुचाकीवरून नेले जाते. यामुळे दुसऱ्या वाहनचालकांना त्रास होऊन त्यातून वादाच्या घटनाही घडलेल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT