A fallen tree on the road esakal
नाशिक

Nashik News : एकाच बाजूच्या छाटणीमुळे कोसळतात वृक्ष

Nashik : एकाच बाजूची छाटणी आणि धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणचा अभाव यामुळे वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एकाच बाजूची छाटणी आणि धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणचा अभाव यामुळे वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रिमझिम पाऊस असताना यंदा आत्तापर्यंत शंभरहून अधिक वृक्ष कोसळण्याच्या घटना शहरात घडल्या आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठे झाले आहे. पावसाळापूर्व कामानिमित्त पावसाळ्यात संभाव्य घटना लक्षात घेता वीज वितरण विभागाकडून उच्च दाबाच्या तारेवर लोंबकळणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणीचे कामे केले जातात. (Tree fall due to pruning on one side )

छाटणी करत असताना त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. केवळ तारांवर असलेल्या एकाच बाजूच्या फांद्यांची छाटणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे अन्य भागावर वृक्षांचा अधिक भार येत असतो. पावसाळ्यात मुळांचा भाग ओला झाल्याने भार आलेल्या भागाकडे वृक्ष झुकला जातो. दैनंदिन पाऊस पडल्याने त्याचे झुकण्याचे प्रमाण वाढत जाते. त्यानंतर अचानक संपूर्ण वृक्ष कोसळण्याची घटना घडत असते.

छाटणी करताना नियोजनपूर्वक छाटणी करून वृक्षाचा समतोल राखल्यास वृक्ष कोसळण्याचे प्रमाण घटण्यास मदत होईल. तसेच महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. अनेक वृक्ष पोकळ झाले आहेत. त्यांचा कोसळण्याचा धोका वाढला आहे. तर काही पुरातन वृक्षांची छाटणी करणे आवश्यक आहे. अशा वृक्षांचा सर्वे करून धोकादायक वृक्ष काढण्यात आले तर वृक्ष कोसळण्याच्या घटना घडणार नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या. (latest marathi news)

अन्य कारणे

-रस्त्यांचे खोदकाम

-रस्ते जमिनीचे काँक्रिटीकरण

-वृक्षांच्या मुळांची वाढ खुंटणे

-मुळांना योग्य प्रमाणात क्षार, पाणी न मिळणे

-फांद्या छाटणीच्या नियोजनाचा अभाव

''वीज वितरण विभागाकडून फांद्या छाटणी करताना दक्षता घेतली जात नाही. एकाच बाजूच्या फांद्या छाटणी केल्या जातात. धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण होत नाही. यामुळे वृक्ष कोसळण्याच्या घटना घडत आहे.''- वसंत गिते, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT