नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केल्यानंतर राज्यातील आदिवासी नेते, संघटना एकटविल्या आहेत. सत्ताधारी आमदार, खासदारासंह २५ आमदार, चार आदिवासी खासदार, माजी लोकप्रतिनिधी यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सोमवारी (ता. २३) विधानभवनात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दालनात बैठक बोलविली आहे. (Tribal leaders united against Dhangar reservation meeting to be held in Mumbai)
बैठकीत सरकारच्या निर्णयाविरोधातील केल्या जाणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर धनगर समाजातील नेत्यांची बैठक गेल्या आठवड्यात घेतली. या बैठकीत धनगर आणि धनगड एकच आहे, असा शासन आदेश काढण्यासाठी सचिव खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने धनगर जात असून, व धनगड जमात असल्याचे सांगत, धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्यास नकार दिला आहे. असे असतानाही राज्य सरकार धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयाला विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी नाशिक येथे आदिवासी नेते, आमदारांची बैठक घेऊन तीव्र विरोध दर्शविला. (latest marathi news)
यात सत्ताधारी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाही सहभागी झाल्याने तसेच राज्यातील आदिवासी संघटनाही आक्रमक झाल्याने सत्तेतील आदिवासी आमदारांचीही कोंडी झाली आहे. त्यासाठी सत्ताधारी आमदार, खासदारांसह विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनीही राज्य शासनाने नियुक्त केलेल्या या समितीविरोधात भूमिका घेतली आहे. त्यासाठी राज्यभरातील २५ आदिवासी आमदार व चार खासदारांनी या निर्णयाविरोधात सोमवारी विधानभवनात बैठक आयोजित केली आहे.
श्री. झिरवाळ यांच्या दालनात ही बैठक होणार असून, बैठकीला आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावितांसह सर्व आजी-माजी आमदार व खासदारांसह आदिवासींच्या संघटनांची प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत. बैठकीतच आगामी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. बैठकीनंतर, मंगळवारी (ता. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.