नाशिक-त्र्यंबकच्या आखाड्यांना सात कोटी
-----------
जुलै २०२७ पर्यंत सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ : सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील आखाड्यांच्या कामांना जोमाने सुरुवात होणार आहे. शैव व वैष्णव या सर्व आखाड्यांना प्रत्येकी सात कोटींचा निधी मिळणार असल्याने आखाड्याअंतर्गत कामे जुलैपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास आखाडा परिषदेने व्यक्त केला आहे.
--------------
सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाल्यानंतर आता पुढील सात ते आठ महिने विकास कामांना गती मिळेल. नवीन घाटांची निर्मिती, रस्त्यांची अपूर्ण कामे, दर्शनपथ, अतिक्रमण व पाणी पुरवठा योजनांची कामे या कालावधीत पूर्ण करण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रगतीपथावरील कामांमुळे ध्वजारोहण सोहळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता येणाऱ्या काळात अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर राहील. विशेषतः त्र्यंबकेश्वरचे दहा शैव आखाडे आणि नाशिकचे तीन वैष्णव आखाड्यांनी सुचविलेली कामे वेळेत पूर्ण कशी होतील, याचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. आखाड्यांना पूर्वी दोन कोटींचा निधी देण्यात आला होता. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला. आता त्यातही वाढ झाली असून सात कोटींवर हा निधी पोहोचल्याचे साधू-महंतांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे कामांची यादी सुपुर्द केली आहे. तसेच कुंभमेळा प्राधिकरणामार्फत ही कामे मंजूर केली जातील. आखाड्याअंतर्गत होणार्या कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असून जुलै २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान राहणार आहे.
…
१६-१
शिवसेनेतर्फे अन्नछत्र
त्र्यंबकेश्वरचे दहा आखाडे आणि नाशिकच्या तीन आखाड्यांमधे कुंभमेळा काळात चालणारे अन्नछत्र हे शिवसेनेमार्फत चालविण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळे आखाड्यांना अन्नछत्रासाठी खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही.
---------------------
कोट
शासनाने कामांना उशिराने सुरुवात केल्यामुळे अजूनही कामे अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाहीत. यापुढे किमान कामांना गती मिळाल्यास जुलैपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील आणि सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थितरीत्या पार पडले.
- महंत शंकरानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.