नाशिक

नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात दोन दिवस बदल

CD
नाशिक- त्र्यंबक वाहतूक मार्गात दोन दिवस बदल राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे बदल ः वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा करावा वापर ----------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिवारी (ता. ३१) त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने वाहतुकीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.३०) सकाळी ८ ते शनिवारी (ता.३१) रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत. वाहनचालकांनी अधिसूचनेचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. - - पर्यायी मार्ग - नाशिक ते त्र्यंबकेश्वर : नाशिक- पिंपळगाव बहुला- संदीप फाउंडेशन- खंबाळे- पेगलवाडी फाटा- त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी अमृत चौक-बारदान फाटा- गोवर्धन- गिरणारे- धोंडेगाव- देवरगाव- वाघेरा फाटा- अंबोली फाटा- सापगाव- त्र्यंबकेश्वर या मार्गाचा वापर करावा. - त्र्यंबकेश्वर ते नाशिक : जव्हार- मोखाडा- अंबोली- त्र्यंबकेश्वर- पेगलवाडी- खंबाळे- संदीप फाउंडेशन- नाशिक या मार्गाऐवजी जव्हार-मोखाडा- अंबोली टी पॉइंट- वाघेरा फाटा- कोने- साप्ते- देवरगाव- गिरणारे- गोवर्धन- नाशिक या मार्गाचा वापर करावा - मुंबईकडून येणारी वाहतूक : वैतरणा फाटा- पहिने- त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी वैतरणा फाटा- नाशिक- अमृत गार्डन- बारदान फाटा-गोवर्धन- गिरणारे- धोंडेगाव- त्र्यंबकेश्वर या मार्गाचा वापर करावा. - पहिने ते नाशिक : पहिने- पेगलवाडी- नाशिक या मार्गाऐवजी पहिने- आहुर्ली- सांजेगाव- वाडीवऱ्हे- नाशिक हा पर्यायी मार्ग वापरावा. - पहिने ते त्र्यंबकेश्वर : पहिने- पेगलवाडी- त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी पहिने- भिलमाळ- निरगुड पाडा- जांभुळपाडा- सापगाव- त्र्यंबकेश्वर या मार्गाचा वापर करावा. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT