Kunal Gangurde  esakal
नाशिक

Nashik Accident News : करंजाडजवळ वाहनांचा तिहेरी अपघात; एक ठार, दोन जखमी

Latest Nashik News : या तिहेरी अपघातात वाहनांसह वाहनचालक व त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना करंजाडी नदीजवळ घडली. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील ताहाराबादहून सटाण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने पुढे जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने पिकअपमधील एक जण ठार झाला तर पिकअप वाहनानाला जोरदार धडक बसताच समोरून येणाऱ्या जितो वाहनावर आदळली. या तिहेरी अपघातात वाहनांसह वाहनचालक व त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना करंजाडी नदीजवळ घडली. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Triple accident near karanjad)

ताहाराबाद, सटाणा या रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मालवाहतूक (ट्रक क्र. एमएच २४, बीडब्ल्यू ५८५९) चालक करंजाड गावानजीक असलेल्या करंजाडी नदीच्या पुलाजवळ मजूर घेऊन चालत असलेल्या पिकअप (क्र. एमएच ४१, जी ३३१) हिस पाठीमागून जोरदार धडक दिली. यात पिकअप वाहनाच्या मागे बसलेला मजूर कुणाल विजय गांगुर्डे (वय२२) हा पिकअपमधून बाहेर फेकला जाऊन थेट ट्रकच्या टायरमध्ये गेल्याने त्याच्या छातीत व कमरेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पिकअप वाहनाला जोरदार धडक बसल्याने समोरून येणा-या जितो वाहन (क्र. एमएच ४१ एयू ७३२२) हिच्यावर आदळली यात जितो वाहनातील चालक रोहित नथू गुंजाळ व त्याच्यासोबत असलेला साथीदार सुधाकर आप्पा शेवाळे यांना मार लागून दुखापत झाली. पिकअप चालक सागर खैरनार (रा. डांगसौंदणे, ता.बागलाण) यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात (नाव माहीत नाही) अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध जायखेडा पोलिस ठाण्यात मजुराच्या मयतास व दोन जण जखमी तसेच दोघा वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असल्याने अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार रविंद्र भामरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT