नाशिक

उमराळे बु येथे डंपर-दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

CD
पान-३--मुख्य अंक ------------- VNI26B13321 उमराळे ः नाशिक- पेठ रस्त्यावर डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातानंतर दोन्ही वाहनांना लागलेली आग. ---------- ३०-२ उमराळेजवळ डंपर-दुचाकीत अपघातानंतर दोघांना आग ---------- दुचाकीस्वार किरकोळ जखमी ---------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२३ : नाशिक- पेठ महामार्गावरील उमराळे बुद्रुक येथील गंगासागर ढाब्यासमोर डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी डंपरखाली गेल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. डंपर आणि दुचाकी जळून खाक झाली. या घटनेत दुचाकीस्वार जयदेव विठ्ठल जाधव (२५) हे जखमी झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही उमराळे बु येथील गंगासागर ढाब्यासमोर डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी डंपरखाली गेल्याने दोन्ही वाहनांना आग लागली. डंपर (एमएच १५ डब्ल्यू ०२७६) आणि दुचाकी (एमएच १५, जेएल १०४२) यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी डंपरखाली गेल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीची तीव्रता वाढल्याने डंपर आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दोन्ही वाहने जळून खाक झाली. दुचाकीस्वार जयदेव विठ्ठल जाधव (२५) जखमी झाले आहे. पोलिसांनी तातडीने दखल घेत आग विझविण्यासाठी आवश्यक मदत मिळावी यासाठी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिंडोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दिंडोरी येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी तात्काळ पाठविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस हवालदार मोकळ आणि सूर्यवंशी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

SCROLL FOR NEXT