drowning death esakal
नाशिक

Nashik News : खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील शेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू

Nashik News : दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Nashik Two brothers died after drowning in Khamkheda marathi news)

खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर व मानव आहेर हे आज सकाळची शाळा करून घरी गेले असता. दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी शेतात गेले होते. दुपारच्या तीन वाजेच्या सुमारास जंगलातून शेतात आलेल्या वांनराना हुसकवुन लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेले.

वानर हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव यांने हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला.

त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत येत काकांना हि घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र शेततळे अर्धे भरलेले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.  (latest marathi news)

शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यु झाला. मृत्यू झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय देवळा येथे शवविच्छेदनासाठी आणून उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

तेजस आहेर (वय १२) हा खामखेडा येथील जनता विध्यालयात इयत्ता सहावीत तर व मानव आहेर (वय ८) हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकत होते. गणेश आहेर यांच्या दोनही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT