a car tire burst accident esakal
नाशिक

Nashik Accident News : कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी

Accident News : पर्यटनासाठी गंगापूर रोड परिसरात गेलेल्या युवकांच्या गाडीचा गंभीर अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : पर्यटनासाठी गंगापूर रोड परिसरात गेलेल्या युवकांच्या गाडीचा गंभीर अपघात झाला. मंगळवारी (ता. २६) सायंकाळी झालेल्या या अपघातात युवक, युवतीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनीकडू सांगितले जात असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. (Nashik Two dead in car tire burst accident marathi news)

रिद्धी प्रशांत गुजराती (वय १८, रा. हिरावाडी रोड), नीरज रवींद्र धारणकर (१८, रा. काठे गल्ली, द्वारका) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कार चालवत असलेला आर्यन फडकर (१७) आणि त्याच्या सोबत कारमध्ये पुढे बसलेली मृण्मयी अहिरे (१८) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बारावीची परीक्षा संपल्याने सुट्यांचा आनंद घेण्यासाठी हे चौघे मित्र नाशिकबाहेर पर्यटनाला निघाले होते. त्यासाठी नातेवाइकांची कार घेत ते मंगळवारी सकाळी गंगापूर रोडच्या दिशेने निघाले होते. दिवसभर मौजमजा केल्यानंतर सायंकाळी घरी परतत असताना बारदान फाटा परिसरात कारचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

गाडीचा वेग प्रचंड असल्याने गाडी कोलांट्या उड्या खात घसरत गेल्याने गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. हा वर्दळीचा रस्ता असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. उपस्थितांपैकी काहींनी पुढे येत मदतकार्य केले. अपघातात मृत रिद्धी व नीरज हे दोघे मागे बसलेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

1,30,00,00,000 रुपयांचा मालक, तरीही सनी देओलच्या पायात फाटके बूट; Video Viral

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT