Sarvesh Kusare esakal
नाशिक

Nashik News : मविप्रच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची सर्वेशसाठी प्रार्थना; उद्याच्‍या पात्रता फेरीचे मविप्रच्या शाखांमध्ये थेट प्रक्षेपण

Nashik : डी. आर. भोसले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारेसाठी अडीच लाख विद्यार्थी प्रार्थना करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पॅरिस ऑलिंपिकमध्ये उंच उडी क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मविप्रच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील डी. आर. भोसले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारेसाठी अडीच लाख विद्यार्थी प्रार्थना करणार आहेत. स्‍पर्धेत सर्वेशचा बुधवारी (ता.७) होणाऱ्या पात्रता फेरीचे मविप्रच्या शाखांमध्ये थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. पॅरिस ऑलिं‍पिक स्‍पर्धा ऐन रंगात आली‍ असून भारतीय खेळाडूंकडून क्रीडाप्रेमींना पदकाच्‍या अपेक्षा आहेत. ()

अशात सर्वेशची स्पर्धेतील प्राथमिक पात्रता फेरी बुधवारी (ता.७) भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी होणार आहे. या फेरीत त्याला यश मिळावे व पुढील स्पर्धा जिंकत त्याने थेट सुवर्णपदक पटकवावे, ही क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. सर्वेशला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळावे, म्हणून मविप्रचे तब्बल अडीच लाख विद्यार्थी परिपाठादरम्यान एकाचवेळी सामूहिकरीत्या सर्वेशसाठी शुभेच्छापर संदेश देणार आहेत. (latest marathi news)

यात जिल्हाभरातील मविप्रच्या सर्व शाखा उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. सर्वेशसाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, सर्व संचालक, सेवकदेखील उपक्रमात सहभागी होणार असून, सर्वेशला शुभेच्छापर संदेश पाठविणार आहेत.

''मविप्रचा माजी विद्यार्थी म्हणून सर्वेशचा संस्थेला विशेष अभिमान व कौतुक आहे. ऑलिंपिकसारख्या जागतिक स्पर्धेतील चुरस व उत्कंठा विद्यार्थ्यांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता यावी व अशा स्पर्धांमधून प्रेरणा घेऊन भविष्यात आणखी खेळाडू तयार होण्यासाठी सर्वेशच्या पात्रता फेरीचे थेट प्रक्षेपण मविप्रच्या विविध शाखांमध्ये दाखविले जाईल.''- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT