Painter who painted from the invention of Chaya Prakash: Monika Wakhare. esakal
नाशिक

Nashik News : छाया-प्रकाशाच्या आविष्कारातून साकारली चित्र; चित्रकार मोनिका वाखारे यांची अनोखी कला

Nashik : ‘असेल आवड तर मिळेल सवड’ आणि जोडीला जिद्द, चिकाटी, सातत्य, सराव असला की यातून आपले ध्येय गाठता येते, याची प्रचिती अनेकदा येते.

सकाळ वृत्तसेवा

डीजीपी नगर : ‘असेल आवड तर मिळेल सवड’ आणि जोडीला जिद्द, चिकाटी, सातत्य, सराव असला की यातून आपले ध्येय गाठता येते, याची प्रचिती अनेकदा येते. कलाकार जेव्हा त्याचे देहभान हरपून त्याच्या कलेशी एकजीव होतो. अशाचप्रकारे देहभान हरपून कलेशी एकजी झालेल्या चित्रकार मोनिका वाखारे यांनी पेन्सिल आणि चारकोलचा वापर करत रेखांकनातून अनेक चित्राकृती साकारल्या आहेत. छाया-प्रकाशाच्या आविष्कारातून चित्र साकारणाऱ्या वाखारे यांच्या चित्राकृतींना विविध संस्थांकडून पारितोषिके मिळाली आहेत. (unique art of painter Monika Wakhare created through invention of shadow and light

मुलांची शाळेच्या तयारीपासून त्यांना शाळेत सोडण्यापर्यंत आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलत मोनिका वाखारे यांनी प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपला चित्रकलेचा वेगळा हतकंडा आवड जोपासत असंख्य चित्रकृती साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेले गणपतीचे चारकोल पेन्सिलमधील चित्र मनाला नजरेला खिळवून ठेवते. चित्रातली प्रमाणबद्धता, आखीव-रेखीवपणा, अनाटोमी परिपूर्ण चित्र साकारल्याची अनुभूती आपल्या नजरेला देऊन जाते. (latest marathi news)

त्यांची महात्मा गांधी, केश संभार, विदेशी मॉडेल, विरह, विविध व्यक्तिचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या चित्रांना विविध संस्थांकडून पारितोषिक मिळाले असून त्यांनी साकारलेल्या ‘पाणी वाचवा, तिला न्याय मिळावा, राष्ट्रीय एकात्मता आणि सोशल मीडियाचे व्यसन’ या विषयावरील डॉ. अपूर्व हिरे मित्रमंडळ आयोजित रांगोळी स्पर्धेत विशेष पारितोषिक मिळाले आहे.

कुटुंबीयांचे प्रोत्साहन

वाखारे यांना त्यांचा चित्रकला छंद जोपासण्यासाठी कुटुंबाची समर्थ साथ असून पती निखिल वाखारे, सासरे दत्तात्रय वाखारे, सासू सुनंदा वाखारे, मुलगा रेहांशू यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळते. कुठले एखादे चित्र काढले की ते तोंड भरून कौतुक करीत प्रोत्साहन देतात व यातून नवीन चित्र काढण्यासाठी प्रेरणा मिळते. यापुढे मुलांना पेन्सिल स्केचिंग, रियालस्टिक पोट्रेटचे क्लासेस घेण्याचा त्यांचा मनोदय असून इतरांनी ही कला जोपासावी, अशी इच्छा असल्याचे मोनिका वाखारे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT