treee felling file photo esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: नाशिकमध्ये 5 ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : शहरात रविवार आणि सोमवारी सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला. शहराच्या विविध भागात ५ ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.

एका ठिकाणी विद्युत डीपीस आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा नुकसान झाले नाही. (Nashik Unseasonal Rain Incidents of trees falling at 5 places in Nashik)

रविवार (ता.२६) आणि सोमवार (ता.२७) सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शहर जिल्ह्यात वृक्ष कोसळण्यासह शेती पिकांचे नुकसान होण्याच्या घटना घडल्या. रविवारी दिवसभर पाऊस कोसळत राहिला.

काही भागात तर जोरदार पाऊस तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. शिवाय नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. सरस्वती नाला, दहिपूल तसेच दिंडोरी नाका, पंचवटी पोलिस ठाणेसमोरील रस्त्यावर पाणी साचले होते.

खडकळी येथील रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या खड्ड्यांसह शहराच्या विविध भागात रस्त्याच्या बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील कच मुरूम वाहून गेल्याने खड्डे उघडे पडून त्यातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.

दुसरीकडे महात्मा गांधी रोड येथील वकीलवाडी, पंचवटी, सिडको, अशोका मार्ग, काठेगल्ली अशा विविध भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. रविवारी वृक्ष कोसळण्याच्या अधिक घटना घडल्या.

अग्निशामक विभागाने वेळीच घटनास्थळी दाखल होत. रस्त्यावरील वृक्ष कापून रस्त्याच्या बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. सुदैवाने दुर्घटना टाळल्या.

दरम्यान स्वामिनारायण पुलावरून एका व्यक्तीने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सिडको येथे विद्युत डीपीत शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली.

वृक्ष कोसळण्याच्या घटना

सिडको १

पंचवटी १

मुख्यालय ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT