Nashik Unseasonal Rain  esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : सिन्नर तालुक्यात शुक्रवारी 7 वाजेच्या दरम्यान पावसाच्या सरी..

Nashik Unseasonal Rain : शुक्रवारी सकाळी, तसेच दुपारी काही मिनिटे तुरळक पाऊस झाला. त्यामुळे काही भागात काढणीस आलेला गहू, हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा : विकास गिते

सिन्नर : मार्चमध्ये रखरखते ऊन तापण्यास सुरुवात झालेली असताना, शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते. जिल्ह्यात बहुतांश भागात अधून-मधून पावसाची रिमझिम सुरू होती. ऐन गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश भागात ज्वारी सोंगणी, गहू काढणीच्या कामे उरकण्यात बळिराजा व्यस्त असल्याचे दिसून आले. (Nashik Unseasonal Rain rained in Sinnar taluka)

शुक्रवारी सकाळी, तसेच दुपारी काही मिनिटे तुरळक पाऊस झाला. त्यामुळे काही भागात काढणीस आलेला गहू, हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात देवपूर पंचक्रोशीतील या भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

तालुक्यात व ग्रामीण परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सध्या काही भागात गहू शेतात उभा आहे. त्यामुळे गहू सोगण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. बेमोसमी पाऊसामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच काही ठिकाणी द्राक्ष बागा असल्याने थोड्याफार प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पावसाने अचानक हजेरी लावली असल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

सिन्नर शहरात शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या दरम्यान पावसाने अचानक हजेरी लावली असल्याने नागरिकांची धावपळ उडाली तसेच घरातून निघालेले नागरिक यांनी दुकानाचा आडोसा घेतला.

दोन्ही ऋतूंचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण या दोन्हीही वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच ज्येष्ठ तसेच लहान मुलांमध्ये या वातावरणामुळे खोकला, ताप, डोके दुखणे अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता होत असून, सकाळी कडक ऊन तर अधून मधून ढगाळ वातावरण या सर्व गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन टोपी, गॉगल, रुमाल या गोष्टींचा वापर करावा व जास्तीत जास्त उन्हाळ्यात पाणी प्यावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT