Suburban police escorting a mentally ill woman. including local citizens. esakal
नाशिक

Nashik Police : मनोरुग्ण महिलेसाठी उपनगर पोलिसांकडून मानवतेचे दर्शन! उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

Nashik News : संवेदनशिल नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, यातून संवेदनशिल नागरिक आणि नेहमीच टीकेचे धनी होणाऱ्या पोलिसांमधील मानवतेचे दर्शन घडले.

नरेश हाळणोर

Nashik Police : पावसाचे पाणी साचलेले... त्या गढूळ पाण्यातच बसलेली ३० ते ३२ वयोची महिला. तेच गढूळ पाणी तहान लागल्यासारखी गटागटा ती पीत होती. काही नागरिकांनी त्या महिलेचा चांगले पाणी देऊ केले पण तिने ते घेतले नाही. पाण्यात भिजलेली, थंडीने कुडकुडत होती... संवेदनशिल नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, यातून संवेदनशिल नागरिक आणि नेहमीच टीकेचे धनी होणाऱ्या पोलिसांमधील मानवतेचे दर्शन घडले. (Nashik upanagar police show humanity for mentally ill woman)

उपनगर परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या ढबक्यात बसलेली महिला मनोरूग्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील संवेदनशिल नागरिकांनी ‘डायल ११२’ला संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी महिला पोलीस अंमलदार अनुराधा दिघे, कैलास पवार, दिलीप बसवे, अंबादास तांदळे यांना घटनास्थळी वाहनासह रवाना केले.

पथक जेव्हा इच्छामणी गणपती मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा इच्छामणी व्ह्यु अपार्टमेंट समोर पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात ३० ते ३२ वय असलेली महिला बसलेली होती आणि तेच पाणी तिच्या ओंजळीत घेऊन पित होती. महिला अंमलदार अनुराधा दिघे यांनी तिला डबक्याबाहेर आणले तेव्हा ती ओली असल्याने थंडीने कुडकुडत होती.

पोलीस आल्याचे पाहून नागरिक आले. यावेळी दत्तू कारवाळ, छाया कारवाळ, मोनाली पुंड, अमित पुंड, अनिशकुमार कटोच यांनी तिला इमारतीच्या पार्किंगमध्ये आणत तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले. तसेच गरम चहा आणून तिला दिला. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला परंतु ती काहीच सांगू शकली नाही. (latest marathi news)

त्यामुळे पोलिसांनी तिला वाहनात बसवून घारपुरे घाटावरील महिलांच्या वात्सल्य याठिकाणी आणले. परंतु महिला मनोरुग्ण असल्याने तिला दाखल करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाण्याला पाठविणार

दरम्यान, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून या मनोरुग्ण महिलेसंदर्भातील माहिती दिली. तिला मनोरुग्ण कक्षेत दाखल करून घेण्यात आले असून तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक पोलीस गार्ड नियुक्त केला आहे. आठवडाभराच्या आरोग्य उपचारानंतर तिला ठाण्यातील महिलांच्या मनोरुग्णालयात दाखल केले जाणार आहे. पोलिसांच्या या मानवतावादी भूमिकेचे नागरिकांनी कौतूक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT