Nashik UPSC civil services exam 42% candidates Absent sakal
नाशिक

नाशिक : UPSC परीक्षेला ४२ टक्‍के परीक्षार्थींची दांडी

पेपरच्‍या काठिण्य पातळीबाबत संमिश्र प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीपासून तर आंतरराष्ट्रीय संबंध, चालू घडामोडींवर आधारित प्रश्‍नांनी परीक्षार्थींची चांगलीच कसोटी पाहिली. पेपर क्रमांक दोनमधील गणित सोडविताना अनेक परीक्षार्थींना घाम फुटला होता. रविवारी नाशिकमधील १९ परीक्षा केंद्रांवर झालेल्‍या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्‍या काठिण्य पातळीबाबत परीक्षार्थींनी संमिश्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. दरम्‍यान, परीक्षेस प्रविष्ट झालेल्‍या सहा हजार १९८ पैकी तब्‍बल दोन हजार ६०१ परीक्षार्थींनी दांडी मारली असून, गैरहजेरीचे प्रमाण ४१.९६ टक्‍के आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांच्‍यातर्फे रविवारी राष्ट्रीय पातळीवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२२ चे आयोजन केले होते. पेपर क्रमांक एकला सकाळी साडेनऊ, तर पेपर क्रमांक दोनला दुपारी अडीचला सुरवात झाली. तत्‍पूर्वी परीक्षा वेळेच्या दहा मिनिटेपूर्वी परीक्षार्थींनी केंद्रावर उपस्‍थित राहण्याच्‍या सूचना दिलेल्‍या होत्या. त्‍यानुसार दहा मिनिटे आधी प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. दरम्‍यान, या परीक्षेला तब्‍बल ४२ टक्‍के उमेदवारांनी दांडी मारली.

नाशिक येथे पार पडलेल्‍या या परीक्षेसाठी समन्‍वयक निरीक्षक म्‍हणून व राज्‍यस्‍तरीय निरीक्षक म्‍हणून प्रत्‍येकी एका अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली होती, तर यूपीएससी निरीक्षक अधिकारी म्‍हणून दोन, स्‍थानिक स्‍तरावरील निरीक्षक १९, परीक्षा केंद्र निरीक्षक १९, सहाय्यक निरीक्षक ३८, अन्‍य ५६० अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ४५ क्‍लेरिकल स्‍टाफ आणि ग्रुप डी स्‍टाफचे ११० कर्मचारी परीक्षेच्‍या संयोजनासाठी तैनात केलेले होते.

गणिताने फोडला परीक्षार्थींना घाम

पेपर क्रमांक एकमध्ये कोविड-१९, आंतरराष्ट्रीय संबंध, चालू घडामोडींसह अन्‍य विषयांवर प्रश्‍न विचारण्यात आले, तर पेपर क्रमांक दोनमधील गणिताच्‍या प्रश्‍नांनी काही परीक्षार्थींना घाम फोडला होता. परीक्षेच्‍या पद्धतीत (पॅटर्न)मध्ये यंदा बदल करण्यात आल्‍याचे परीक्षार्थींनी सांगितले.

परीक्षेतील क्षणचित्रे...

  • मास्‍क घालून परीक्षार्थींनी दिले दोन्‍ही पेपर

  • परीक्षा केंद्राबाहेर मात्र मास्‍कचा वापर नाही

  • परीक्षा केंद्राभोवती जॅमर, चोख पोलिस बंदोबस्‍त

  • अनेक परीक्षार्थींनी प्रथमच दिली यूपीएससी परीक्षा

  • नाशिकच्‍या केंद्रामुळे उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांची सुविधा

  • पेपर सुटताना अनेक पालकांची केंद्राबाहेर उपस्‍थिती

  • निरीक्षकांची परीक्षा केंद्रावर करडी नजर, अधिकाऱ्यांच्‍या केंद्रांना भेटी

चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय संबंधांशी निगडित प्रश्‍न सोपे वाटले. विज्ञानावर आधारित प्रश्‍नांची संख्या लक्षणीय होती. गणिताचे प्रश्‍न अवघड होते.

- ओंकार देवकर, चांदोरी

पेपर क्रमांक एक अवघड वाटला, तर दुपार सत्रातील पेपर दोन सोपा गेला. नाशिकमध्ये केंद्र असल्‍याने सुविधा झाली असून, दमछाक टळली. एकंदरीत परीक्षा चांगली झाली.

- भावेश पाटील, धुळे

दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. गेल्‍या वेळच्‍या चुका टाळत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्‍न केला. परीक्षापद्धतीतील बदल सकारात्‍मक राहिले.

- युवराज शेवाळे, मालेगाव

दोन्‍ही पेपर चांगले गेले असून, पेपर दोन हा विशेषतः कला शाखेतील परीक्षार्थींसाठी सोपा राहिला. वेळेत सर्व प्रश्‍न सोडविता आल्‍याने आता निकालाकडे लक्ष लागून राहील.

- जयदीप जगताप, सिन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT