नाशिक

अर्बन चॅलेंज फंडात नाशिक देशात आघाडीवर

CD
मेन -------------- ‘अर्बन चॅलेंज फंड’मध्ये नाशिक देशात अव्वल! प्रकल्प मंजुरी अन् निधी मिळविण्यात बाजी; चार प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ अंतर्गत देशात नाशिकने प्रकल्प मंजुरी व निधी मिळविण्यात आघाडी घेतली आहे. एकूण चार प्रकल्पांचे काम जवळपास ३० टक्के पूर्ण झाले असून, कामांच्या बाबतीतही आघाडी घेतल्याने निधीस पात्र ठरलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी देशातील सर्व शहरांसाठी अर्बन चॅलेंज फंड घोषित केला आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची केंद्रीय मदत जाहीर करण्यात आली आहे. यातून पुढील पाच वर्षांत शहरी भागात तब्बल ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. अनुदानावर आधारित विकासाकडून बाजाराशी जोडलेल्या, सुधारणांवर आधारित आणि परिणामाभिमुख विकासाकडे वाटचाल करणे या योजनेची मुळ संकल्पना आहे. प्रकल्पासाठी केंद्राकडून २५ टक्के रक्कम तर उर्वरित रकमे पैकी किमान ५० टक्के रक्कम महापालिकांना बॉण्ड, बँक कर्ज किंवा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मधून उभारावी लागणार आहे. उरलेले २५ टक्के राज्य सरकार किंवा महापालिकेच्या स्वतःच्या निधीतून उभारावे लागण्याची हि योजना आहे. देशभरात आतापर्यंत ३३ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, त्यात नाशिक शहरातील चार प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या या प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर असून नोव्हेंबर अखेर पर्यंत ५१ कोटींचा निधी महापालिकेला मिळणार आहे. सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने आढावा घेतला त्यातून नाशिक आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ------------------- हे आहेत प्रकल्प (प्रकल्प कामांची स्थिती व मिळणारा निधी कोटीत) - थेट पाइपलाइन व पाणी शुद्धीकरण केंद्र - ४०० कोटी (१००, ३२ टक्के काम पूर्ण) - क्लीन गोदावरी मिशन - २२५ कोटी (५५, २५ टक्के काम पुर्ण) - रामकाल पथ पुनर्विकास (फेज-२) - ६२.५१ (१५.६३, ५० टक्के काम पुर्ण) - बायो पॉवर जनरेशन प्लान्ट (पीपीपी)- १० (१.२५, शून्य टक्के काम) --------कोट-------- (फोटो घ्यावेत) रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शहरी वाहतूक व सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या दृष्टीने ही मंजुरी शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. - मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका. --------------------- (फोटो घ्यावा) अर्बन चॅलेंज फंडमध्ये नाशिकने देशात आघाडी घेतली असून राज्यातही नाशिकचे मॉडेल चर्चेत आहे. महापालिकेने आधीच बॉण्डमधून ४०० कोटी रुपये उभारल्यामुळे केंद्राची बाजारातून निधी उभारण्याची अट पूर्ण झाली आहे. शहर विकासासाठी ही बाब महत्त्वाची आहे. - हिमगौरी आडके, महापौर. -------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT