V. N. Naik Institution Election esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : संस्थेत वारसांना हक्क मिळवून देणारच : कोंडाजीमामा आव्हाड

Nashik : तरुण विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकास आराखडा आखण्यात आला आहे. प्राधान्याने वारस सभासद नोंदणी हाती घेतली जाणार असल्याचे परिवर्तन पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार कोंडाजीमामा आव्हाड यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने जाहीर केलेला शपथनामा निश्चितच वचनपूर्तीनामा ठरेल. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची क्षमता पॅनलच्या सर्व उमेदवारांमध्ये आहे. त्याची जाणीव सर्व मतदारांना असून, ते पूर्णपणे सहकार्य करतील हा विश्वास आहे. आगामी पाच वर्षांतील संस्थेच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. (V. N. Naik Institution Election)

तरुण विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकास आराखडा आखण्यात आला आहे. प्राधान्याने वारस सभासद नोंदणी हाती घेतली जाणार असल्याचे परिवर्तन पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार कोंडाजीमामा आव्हाड यांनी सांगितले. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान शनिवारी (ता. २७) होत आहे. संस्थेचे एकूण साडेआठ हजारांहून अधिक मतदार आहेत.

त्या सर्वांचा एकच ध्यास असून, त्यांना संस्थेच्या कारभारात सुयोग्य परिवर्तन घडवून आणण्याची आस लागली आहे. संस्थेतील पाच वर्षांतील हुकूमशाही बाजूला करून सभासदांना विश्वासात घेऊन लोकशाही पद्धतीने काम करणार असल्याचे आव्हाड यांनी जेल रोड, मेरी-म्हसरूळ तसेच कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात मतदारांशी संवाद साधताना त्यांनी पॅनलची भूमिका मांडली.

परिवर्तन पॅनलने संपूर्ण नाशिक शहर परिसरासह सिन्नर, येवला- मालेगाव, निफाड- चांदवड, नांदगाव‌-बागलाण, दिंडोरी-पेठ-सुरगाणा येथे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून, पॅनलच्या उमेदवारांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला आहे. दहा दिवसांत सर्व मतदारांच्या थेट गाठीभेटी घेतल्याने त्यांचा उत्साह बघून विक्रमी मतदानातून सभासद आपला कौल देतील, असा विश्वास पॅनलच्या सरचिटणीसपदाचे उमेदवार माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला. (latest marathi news)

प्राधान्याने वारस सभासद नोंदणी हाती घेतली जाईल. संस्थेच्या विकासकार्यात समाजातील युवकांना सामावून घेतले जाईल. घटनात्मक सल्लागार समिती स्थापन केली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होईल. गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक दर्जाच्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येतील.

सामाजिक आरोग्यासाठी सुसज्ज वैद्यकीय शिक्षण व संलग्न अद्ययावत रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले. उदय घुगे, बाळासाहेब सानप, अॅड. जयंत सानप, गोकुळ काकड, बाळासाहेब चकोर, लक्ष्मण जायभावे, नारायण पालवे, धर्माजी बोडके, बाळासाहेब वाघ, रामनाथ सानप.

बबन कांगणे, भाऊसाहेब गिते, प्रकाश नागरे, किरण गिते, भाऊसाहेब सांगळे, काशीनाथ सानप, उद्धव कुटे, रामनाथ नागरे, विश्वास सानप, सुभाष आव्हाड, भगवंत चकोर, बापू दरगोडे, महेश सानप, रमेश वाघ, प्रकाश उगले, नीळकंठ सानप, रंजना सांगळे, म्हाळसाबाई सोनवणे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT