Cervical Cancer esakal
नाशिक

Cervical Cancer Prevention : गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक!

Health News : ९ ते २४ वयोगटातील मुलींनी घेतल्यास भविष्यात कर्करोगापासून त्यांचा बचाव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवजात बालकाला भविष्यात क्षयरोग होवू नये म्हणून जशी बीसीजी लस दिली जाते. त्याचप्रमाणे, मुलींना भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लागण होवू नये, त्यासाठी एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लस देणे गरजेचे असते. (Cervical Cancer Prevention) महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग होण्याचे प्रमाण दरवर्षी एक लाख २३ हजार इतके आहे पैकी ६७ हजार महिलांचा त्यात मृत्यू होतो.

कर्करोगांच्या सर्व प्रकारांपैकी केवळ गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. जी ९ ते २४ वयोगटातील मुलींनी घेतल्यास भविष्यात कर्करोगापासून त्यांचा बचाव होत असल्याचे अनेक तपासणींमधून दिसून आल्याचे कॅन्सर तज्ज्ञांसह अनुभवी डॉक्टर सांगतात... (nashik prevent women cervical cancer health care marathi news)

वर्ल्ड हेल्थ ऑगनायझेशनच्या अहवालानुसार महिलांमध्ये आढळून येणारा स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा चौथ्या क्रमांकाचा सामान्य कर्करोग आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग कॉमन कर्करोग आहे. जो एचपीव्ही नावाच्या व्हायरसमुळे होतो. लैगिंक संपर्कानंतर एचपीव्ही व्हायरस शरीरात पसरतो.

कालांतराने व्हायरस शरीरात कायम राहिल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. थोडक्यात लैगिंक संबधानंतर एचपीव्ही व्हायरस निर्माण होतो आणि त्यातून कर्करोग होण्याची शक्यता असल्याने लैगिंक संबंध प्रस्थापित होण्यापूर्वी लस घेणे फायद्याचे ठरते.

स्त्री-पुरुष दोघांचा विचार करता भविष्यात ही लस पुरुषांसाठी आवश्यक असणार आहे. काही देशांमध्ये पुरुषांसाठी लस दिली जात आहे तर, भारतात अजूनही मुलींच्या बाबतीत फारशी जनजागृती नसल्याने मुलांचा प्रश्न बराच दूर राहतो. त्यासाठी समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात ९ ते १४ वयोगटातील शालेय मुलींसाठी ही लस पूर्णपणे मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते परंतु त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.  (latest marathi news)

कशी घेतात लस

सध्या तीन प्रकारच्या लस बाजारात उपलब्ध आहेत पैकी दोन परदेशी तर एक भारतीय बनावटीची लस आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी दोन डोस ० ते ६ महिने तर १५ ते २४ वयोगटातील मुलींसाठी एकूण तीन डोस ०-२-६ महिन्यांच्या अंतराने देता येते. त्यानंतर या मुलींना आयुष्यात पुन्हा डोस घेण्याची गरज पडत नाही आणि गर्भशया मुखाचा कर्करोग होण्याची कोणतीही भीती नसते.

शिवाय लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. २४ ते ४५ वयोगटातील महिलांनी लस घेतली तरी चालते कारण गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रकार असल्यामुळे घेतलेली लस फायद्याची ठरू शकते. लस शक्य नसल्यास दर दोन ते तीन वर्षांनी गर्भाशय मुखाची तपासणी करून घ्यावी.

"त्वचेवर डाग पडला तर लगेच लक्षात येते पण, गर्भाशयाचे मुख योनी मार्गाच्या आत असल्याने होणारे बदल लगेच लक्षातही येत नाही शिवाय दिसूनही येत नाही. त्यासाठी महिलांनी दर दोन ते तीन वर्षांनी गर्भाशय मुखाची तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या कर्करोगाची भीती नाहिशी होते."- डॉ. रविराज खैरनार, स्त्रीरोग तज्ज्ञ

"एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. भविष्याचा विचार करता कर्करोग होवू नये म्हणून मुल-मुली दोघांसाठी लस घेणे आरोग्याच्या दृष्टिने फायदेशीर ठरणार आहे. जेणेकरून कर्करोगाचे प्रमाण आटोक्यात राहील."

- डॉ. राज नगरकर, कर्करोग तज्ज्ञ

"एचपीव्ही लस वय वर्षे ९ ते पहिला शारीरिक संबंध येण्या अगोदर घेतल्यास भविष्यात कर्करोगापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. शासनच लसीकरणासंदर्भात निर्णय घेत आहे. या निर्णयानुसार लसीकरण झाल्यास भारतात निश्‍चितच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होईल."- डॉ. भूषण नेमाडे, कर्करोग तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT