drug esakal
नाशिक

Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

Nashik : ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याच्या शिंदेगावातील ड्रग्ज कारखाना आणि ललितच्या नाशिकमधून पलायनप्रकरणात शहर गुन्हेशाखेने वैभव लहामगे याची चौकशी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याच्या शिंदेगावातील ड्रग्ज कारखाना आणि ललितच्या नाशिकमधून पलायनप्रकरणात शहर गुन्हेशाखेने वैभव लहामगे याची चौकशी केली होती. त्यामुळे त्याचा ड्रग्जशी संबंधावरून चौकशी होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील राजूर फाट्यावर कुस्तीपटू भूषण लहामगे यांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ठाण्यातून मुख्य संशयित वैभव लहामगे यास अटक केली आहे. ( Vaibhav was also investigated in drug case )

तर, नुकत्याच आयसीआयसीआय बँकेच्या लॉकरमधील पाच कोटींच्या सोनेचोरीच्या गुन्ह्यातही वैभव संशयित आहे. गेल्या शुक्रवारी (ता.१०) भरदिवसा नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे कुस्तीपटू भूषण लहामगे याची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. याप्रकरणी वाडिवर्र्हे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असून, मयत भूषण हा मुख्य संशयित वैभवचा चुलत भाऊ होता.

वैभव याने जमिनीसह आर्थिक वादातून भूषण यांचा खून केल्याचे तपासातून समोर येते आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या वैभव याच्या या खुनामध्ये त्याचे साथीदार सतिश चौधरी, रतन जाधव यांचाही समावेश असण्याची शक्यता असून, याच दोघांच्या मदतीने जुन्या गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या लॉकरमधील पाच कोटींचे सोन्याचे दागिने चोरीची गुन्हा केला आहे. त्यामुळे शहर पोलिसांसह ग्रामीण पोलीसही सतिश चौधरी, रतन जाधव यांच्या मागावर असून कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये ड्रग्ज माफिया ललित पानपाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळाला होता. त्यावेळी तो नाशिकमध्ये आला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत वैभव लहामगे याचीही पोलिसांनी चौकशी केली होती. परंतु त्याचा ललितच्या प्रकरणात थेट संबंध वा पुरावा पोलिसांची हाती लागला नव्हता. मात्र, त्याच्याकडून पोलिसांना ललितच्या कारनाम्याची माहिती मिळाली होती. सराईत गुन्हेगार असलेल्या वैभवच्या आणखी गुन्ह्यांमध्येही समावेश असण्याची शक्यता गृहित धरून पोलिस तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT