Vegetable Rate Hike esakal
नाशिक

Nashik Vegetable Rate Hike : पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले; टोमॅटो, भेंडी 80 रु. किलो

Vegetable Rate Hike : जून संपण्यावर आला तरी पावसाचे आगमन होत नसल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vegetable Rate Hike : जून संपण्यावर आला तरी पावसाचे आगमन होत नसल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. पाण्याअभावी अर्धवट वाढ झालेल्या टोमॅटोला ८० रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. तर अव्वल दर्जाचा टोमॅटोची किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. शाळा सुरु झाल्यापासून भेंडीच्या मागणीत वाढ झाल्याने २० रुपये पावशेरने विक्री होते. याशिवाय पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथंबीर ५० रुपयांना जुडी मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला घेणे काहीअंशी आवक्याच्या बाहेर जात आहे. ( Vegetable Rate Hike due to delay in monsoon )

जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. परंतु, यंदा जून संपण्याला एकच आठवडा शिल्लक असताना अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी, भाजीपाल्याची आवक घटली आहे. विशेषत: टोमॅटो, मेथीची भाजी, वांगी, मिरची, दुधी भोपळा, कोथंबीर यांच्या किमतीत अचानकपणे वाढ झालेली दिसून येते. टोमॅटो, वांगी, मिरची, कारले व भेंडी ८० रुपये किलोप्रमाणे मिळत आहे.

तर पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथंबीर सर्वात महाग आहे. ५० रुपयांना एक जुडी मिळते. या तुलनेत पालक आणि तांदुळक्याची भाजी स्वस्त असून, १० ते २० रुपयांना जुडी मिळते. वर्षभर भाव खाणारी मिर्ची यंदाही ‘तिखट’च आहे. २० ते ३० रुपये पावशेर याप्रमाणे मिरचीची विक्री होत आहे. शिमला मिरची ६० रुपये किलो पर्यंत मिळते. दोडके, गिलके ३० रुपये पावशेरने मिळत आहेत.

उन्हाळ्यात ‘चिप्स’मुळे भाव खालेले बटाटे आता जागेवर आले आहेत. ६० रुपये किलोपर्यंत बटाटे मिळत आहेत. एकंदरित, पालेभाज्यांपेक्षा फळभाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढलेले दिसून येतात. जुलैमध्ये चांगला पाऊस पडला तर पालेभाज्यांचे दर अजून कमी होऊ शकतात. टोमॅटो व भेंडीचे दर अजून काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.

उसळच्या मागणीत वाढ

फळभाज्या व पालेभाजांची किंमत वाढल्याने मठाच्या उसळच्या मागणी वाढली आहे. २० रुपये पावशेर या दराने ही उसळ मिळत असल्याने अर्धा किलोमध्ये दोन वेळा भाजी करण्याला गृहिणी पसंती देतात. कांद्याचे दरही आता वाढले असून किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने उन्हाळ कांदा मिळत आहे.

भाजीपाल्याचे दर (प्रती किलो)

टोमॅटो ७० ते ८० रु.

कांदा ३५ ते ४० रु.

बटाटा ५० ते ६० रु.

भेंडी ७० ते ८० रु.

गिलके-दोडके ७० ते ९० रु.

शेवगा शेंग ८० ते ९० रु.

कोथिंबीर ५० रु. (जुडी)

मेथी ५० रु. (जुडी)

गड्डा कोबी ४० रु.

वांगी ८० रु.

डांगर ८० रु.

मिरची ८० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT