Vegetable Rate Hike esakal
नाशिक

Nashik Vegetable Rate Hike : पालेभाज्यांची आवक 20 टक्क्यांवर; बाजारभाव वधारले

Vegetable Rate Hike : वातावरणात बदल झाला असून परिणामी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटली आहे.

योगेश मोरे

Nashik Vegetable Rate Hike : गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून बुधवार (ता. १७) पावसाची उघडीप सुरू होती. यामुळे वातावरणात बदल झाला असून परिणामी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटली आहे. यामुळे पालेभाज्या व फळभाज्या बाजारभाव वधारले आहे. नाशिक बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागातून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. (Vegetable Rate Hike Inflow of leafy vegetables to 20 percent )

पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे पंधरा ते वीस टक्क्यांवर आली आहे. यामुळे भाव वधारले असून, स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत परिणामी वाढली आहे. फळभाज्यामध्ये सध्या काकडी, शिमला यांची सीजननुसार आवक आहे, मात्र, दोडका कारली, गिलके आदी फळभाज्यांची आवक घटली आहे.

बाजार समितीत बुधवारी पार पडलेल्या लिलावात काकडी १० ते ३५ रुपये, दुधी भोपळा १२ ते १८ रुपये प्रतिकिलो, गिलके ५० ते ६५ रुपये किलो, कारले ३० ते ४५ रुपये किलो, दोडका ४० ते ५५ रुपये किलो, शिमला मिरची २५ ते ४० रुपये किलो, हिरवी मिरची ४० ते ५५ किलो, वाल ४५ ते ५५ रुपये प्रतिकिलो, गवार ३० ते ४० रुपये प्रतिकिलो, घेवडा ५० ते ६५ रुपये प्रतिकिलो, गाजर २० रुपये ते २६ रुपये प्रतिकिलो, वांगी २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो, भेंडी ४० ते ५० प्रतिकिलो रुपये असा भाव मिळाला. (latest marathi news)

किरकोळ विक्रेत्यांकडे वाढीव भाव

किरकोळ विक्रेत्यांकडे हेच भाव प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये वाढीव असतात. बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर ७ ते ६७ रुपये चायना कोथिंबीर ५ ते ३५ रुपये झूडी, मेथी १० ते ३० रुपये झूडी, शेपू १५ ते ३३ रुपये झूडी, कांदापात ४० ते ८७ रुपये झूडीला भाव मिळत आहे.

तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची झूडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत. जिल्ह्यात पावसाची सुरवात झाली असून सद्यःस्थितीत उघडीप सुरू आहे. या पावसामुळे बऱ्याचशा पालेभाज्या या भिजल्या जातात. या पालेभाज्यांना प्रतवारीनुसार बाजार भाव मिळत असून, यात भिजलेला पालेभाज्यांना दर कमी मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT