नाशिक

दसर्याचा उत्‍साह दिवाळीपर्यंत राहाणार

CD
33100 नाशिक : दसरानिमित्त वाहन खरेदी करताना ग्राहक. ईव्‍ही, सीएनजी, हायब्रीड गाडी विक्रीचे प्रमाण ४० टक्‍यांपर्यंत नाशिक, ता. २०ः दसरा व नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर ऑटोमोबाईल बाजारपेठेत मोठी तेजी पाहायला मिळाली. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीतून मोठी उलाढाल झाली आहे. एकूण विक्री झालेल्‍या वाहनांमध्ये, विशेषतः प्रवाशी चारचाकी वाहनांमध्ये ईव्‍ही, सीएनजी व हायब्रीड या प्रकाराच्‍या गाड्यांचे प्रमाण सुमारे ४० टक्‍के झाले आहे. दरम्‍यान दसऱ्याला या क्षेत्रात ग्राहकांचा उत्‍साह दिवाळीपर्यंत कायम राहाण्याचा अंदाज आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन वाहन वितरकांनी तब्बल अडीच ते पावणेतीन महिन्यांचा साठा आधीच उपलब्ध करून ठेवला होता. या कालावधीत दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली असून चारचाकी वाहनांमध्ये स्मॉल, मिड आणि एसयूव्ही अशा सर्व प्रवाशी वाहनांना मोठी मागणी दिसून आली. अनेक ग्राहकांनी महिना ते दीड महिना आधीच बुकिंग करून ठेवल्याने त्यांना नवरात्री, दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी मिळाली. तर काहींनी दिवाळीसाठी आतापासूनच आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. ट्रॅक्टर आणि कन्स्ट्रक्शन उपकरणांचा अपवाद वगळता सर्व प्रवासी वाहन प्रकारांमध्ये विक्रीचा आलेख उंचावला आहे. इलेक्ट्रिक (ईव्‍ही), हायब्रिड आणि सीएनजी वाहनांची एकत्रित विक्री आता जवळपास ४० टक्क्यांच्या घरात पोहोचली आहेत. --- दुष्काळामुळे ट्रॅक्‍टर विक्रीत घट गेल्‍यावर्षी २०२५ मध्ये ऑक्‍टोबर महिन्‍यात दसरा व दिवाळी असे दोन्‍ही सण एकत्र आले होते. त्‍यामुळे २०२५ मधील वाहन विक्रीचा आकडा मोठा होता. २०२६ मध्ये ऑक्‍टोबरमध्ये दसरा व नोव्‍हेंबरमध्ये दिवाळीचा सण आहे. यावर्षी दुष्काळाची परीस्‍थिती लक्षात घेता, सर्वाधिक फटका ट्रॅक्‍टर विक्रीवर जाणवतो आहे. गेल्‍यावर्षी जिल्ह्यात सुमारे ६५० ट्रॅक्‍टर विक्री झाले होते. यंदा जेमतेम दोनशे ट्रॅक्‍टर विक्री झाले आहेत. गेल्‍यावर्षी २०२५ ला ऑक्‍टोबरमध्ये ११ हजार दुचाकी तर सुमारे साडेचार हजार चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. यंदाच्‍या वर्षी दसर्यापर्यंत साडेपाच हजार दुचाकी तर दोन हजार चारचाकी वाहनांची विक्री झालेली आहे. आगामी दिवाळीच्‍या हंगामात विक्रीचा कल कायम राहाणार असल्‍याने, हंगामाच्‍या एकूण आकडेवारीमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्‍यावसायिकांनी वर्तविला आहे. ---- 33142 नवरात्रोत्‍सव, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वितरकांनी जादाच्‍या वाहनांची बुकींग केली होती. अपेक्षेप्रमाणे ग्राहकांनी प्रवाशी वाहन खरेदीला, दुचाकी खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. विशेषतः पेट्रोल वाहनांच्‍या तुलनेत यंदा पर्यायी इंधनाच्‍या गाड्यांना पसंती वाढली आहे. - सचिन महाजन, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Dussehra Rally : ''होय, आम्हाला रेजीम चेंज करायची आहे'', दसऱ्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

SCROLL FOR NEXT