नाशिक

कारसह दोन दुचाक्या चोरीला

CD
कारसह दोन दुचाकींची चोरी वाहन चोरट्यांचा वाढता सुळसुळाट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : शहर परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. चोरट्यांनी कारसह दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महात्मानगर मैदानाजवळ पार्क केलेली नील जयेश पटेल (२०, रा. सावतानगर, सिडको) याची मोपेड (एमएच १५ एचडब्ल्यु १४५६) चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पगार पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत ​राज दीपक गरुड (२६, रा. चेतना वैभव अपार्टमेंट, राणेनगर) यांनी दुचाकी (एमएच १५ एचव्ही २९८७) पार्किंगमधून रविवारी (ता. २५) मध्यरात्री चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, हवालदार पगारे तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत घरासमोर लॉक करून पार्क केलेली ४ लाख ९५ हजार रुपये किमतीची किया सेल्टॉस कार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वृंदावन नगर परिसरात घडली. वसंत श्यामराव महाले (४७, रा. साई रो-हाउस) यांनी किया सेल्टॉस कार (एमएच ०२ एफएन ३८८४) घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीतून आलेल्या चोरट्यांनी ही कार चोरून नेली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT