School garden  esakal
नाशिक

Nashik News : राज्यात सर्व शाळांमध्ये आता परसबाग; शहरी शाळांमध्ये होणार व्हर्टिकल गार्डन

Nashik News : केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून भाजीपाला तयार करण्यात यावा.

विजय पगारे

इगतपुरी : केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून भाजीपाला तयार करण्यात यावा. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा हा महत्वाकांक्षी उद्देश ठेवून आता आता राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Vertical garden)

विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला,फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता यावा.

तसेच ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होणार आहेत. राज्यातील २५ हजार शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्यास सुरवात झाली आहे. (latest marathi news)

शहरात व्हर्टिकल गार्डन

शहरी भागात ज्या ठिकाणी जागेच्या अडचणी आहेत,अशा शाळांमध्ये व्हर्टिकल गार्डनची उभारणी करण्यात यावी. यासाठी ११ जुलै २०२३ शासन निर्णयात सूचना दिलेल्या आहेत.

नागरी भागात विशेषतः बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या भागातील शाळांमधून परसबागांची उभारणी करण्याकरिता विशेष तज्ञ लोकांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने शासनाने २७ फेब्रुवारी २०२४ ला तज्ञांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT