election expenditure esakal
नाशिक

Nashik Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारांना 40 लाखांची खर्च मर्यादा; 2019 च्या तुलनेत 12 लाखांनी मर्यादा वाढली

Latest Vidhan Sabha Election 2024 News : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांची खर्च मर्यादेत १२ लाखांनी वाढ करून ४० लाख रुपये केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांची खर्च मर्यादेत १२ लाखांनी वाढ करून ४० लाख रुपये केली आहे. (Vidhan Sabha election Expenditure limit for candidates of 40 lakhs)

लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना ९० लाखांची खर्च मर्यादा होती. या तुलनेत विधानसभा मतदारसंघ छोटा असल्याने त्यातील उमेदवारांना ४० लाखांची मर्यादा घालून दिली आहे. निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आणि त्यांच्या पक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.

प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती विहीत नमुन्यातच प्रसिद्ध करावी लागेल. पक्षांनी त्यांच्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. आयोगाने विहीत केलेल्या सी- १ नमुन्यात वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे उमेदवारांनी प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.

पक्षांनी त्यांच्यासाठी विहीत केलेल्या सी-२ नमुन्यात वर्तमानपत्र, इलेक्ट्रॅानिक मीडिया आणि पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी द्यावी. प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीची तीन वेळा प्रसिद्धी द्यावी. प्रथम प्रसिद्धी ही उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसांतच करावी. दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसांत करावी आणि तिसरी प्रसिद्धी नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसांपर्यंत करण्याचे आदेश आहेत. (latest marathi news)

प्रशासन सज्ज

निवडणुकीसाठी साहित्य, विविध अर्ज, विहित नमुने, पाकिटे, हस्तपुस्तिका, दिशानिर्देशांचा संच यांची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी वर्षभरापासून मुद्रणालय स्तरावर नियोजन सुरू होते. निवडणुकीचे काही दिवस आधी हे साहित्य जिल्हा प्रशासनाकडून आणण्यात येणार आहे.

साहित्य मिळाल्यावर त्याचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदान केंद्रनिहाय वितरणासाठी तयारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT