नाशिक

नाशिकमधे १० हजार ग्रामसेवक, सरपंचांचे ग्रामविकासावर मंथन

CD
फोटो : 31553 नाशिक : पंचवटीतील मोदी मैदानाची पाहणी करताना ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार. नाशिकमध्ये १० हजार ग्रामसेवक, सरपंचांचे ग्रामविकासावर मंथन --- मंत्री गोरे यांच्याकडून पाहणी; रविवारी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे रविवारी (ता. ११) नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पंचवटीतील मोदी मैदानाची पाहणी केली. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’चा बक्षीस वितरण समारंभ, तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-२ (२०२६-२७)’चा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या वेळी ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा, तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येईल. याचबरोबर ‘भूगर्भ जलाचे संवर्धन उपलब्ध जलसाठ्याचा परिणामकारक वापर व दुष्काळ परिस्थिती हाताळण्याबाबत विविध कौशल्ये विकसित करणे’ या विषयावर सरपंच परिसंवाद होणार आहे. या मेळाव्यासाठी सुमारे १० हजार सरपंच, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीच्या दृष्टीने मोदी मैदानावरील जागेची पाहणी मंत्री गोरे यांनी केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे उपस्थित होते. जलसंधारणाचे धडे सरपंच आणि ग्रामसेवकांना गावाच्या विकास आराखड्याबरोबरच पाण्याच्या प्रश्नावर स्थानिक पातळीवर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. चारापुरवठा, भूगर्भातील पाणीसाठा वाढविणे, जलसंधारणाच्या उपाययोजना, पाण्याबाबत जनजागृती आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गावपातळीवरील नियोजन या विषयांवरही चर्चा होईल.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT