नाशिक

सुनावणीकडे जिल्ह्यातील मतदारांची पाठ

CD
सुनावणीकडे जिल्ह्यातील मतदारांची पाठ एसआयआर मोहिम : जिल्हा प्रशासनातर्फे संपर्क सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेमध्ये (एसआयआर) अपूर्ण माहिती व संदिग्धता असलेल्या मतदारांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात येत आहे. पण, नोटीस बजावूनही मतदार सुनावणीकडे पाठ फिरवत असल्याचा अनुभव महसूल प्रशासनाला येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात एसआयआरचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ७ लाख ३४ हजार ६८५ मतदारांची सुनावणी घेण्यात आहे. मतदारांचे वय, पालक व मतदारांमधील वयाचे अंतर, नावात अपूर्णता, महिलांचे लग्नानंतरच्या नावाबद्दलचे पुरावे तसेच रहिवासी पत्त्यामधील गोंधळ अशा निरनिराळ्या १२ प्रकारच्या माहितीमध्ये संदिग्धता असल्याने मतदारांची सुनावणी घेतली जात आहे. मतदान केंद्रधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून संबंधित मतदारांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. सदर नोटिसीवर सुनावणीसाठीची वेळ, तारीख तसेच ठिकाण नमूद करण्यात आले आहे. मतदारांना सुनावणीसाठी येताना सोबत १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येत आहेत. एसआयआरच्या पहिल्या टप्यात बहूतांक्ष मतदारांना प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराचा अनुभव आला. त्यामुळे टीकेचे धनी झालेल्या प्रशासनाने दुसऱ्या टप्यात सर्वतोपरी खबरदारी घेतानाच नोटीस बजावलेल्या मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून घरपोच नोटीस बजावल्यानंतर सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत वेळोवेळी बीएलओंमार्फत संपर्क साधला जातोय. मात्र, प्रशासनाच्या पुढाकारानंतरही मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. १० नोव्हेंबरपर्यंत मुदत एसआयआर मोहिमेत दावे-हरकती तसेच सुनावणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रशासनाला १० नोव्हेंबरपर्यंत दाखल दावे-हरकती निकाली काढायच्या आहेत. १६ नोव्हेंबरला मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२४ तास तुरुंगात राहिल्यानंतर कसं वाटलं? अभिजीत दीपकेंनी शेअर केला शाहरुख खानच्या चित्रपटातील सीन

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

SCROLL FOR NEXT