Waldevi river polluted due to illegal businesses industries esakal
नाशिक

Nashik News : अवैध धंदे, उद्योगांमुळे वालदेवीचे पात्र प्रदुषित

Nashik News : नाशिक रोड, पाथर्डी फाटा दाढेगाव वडनेर विहित गाव देवळाली गाव आणि पंचक्रोशीतून वाहणारी वालदेवी नदी सध्या प्रदूषित झालेली पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड, पाथर्डी फाटा दाढेगाव वडनेर विहित गाव देवळाली गाव आणि पंचक्रोशीतून वाहणारी वालदेवी नदी सध्या प्रदूषित झालेली पाहायला मिळत आहे. नदीकिनारी असणारे लघु उद्योगांनी वालदेवी धरणातील मासेही काही दिवसांपूर्वी गतप्राण झाले. केमिकल मिसळल्यामुळे हे मासे गतप्राण झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नदी किनाऱ्यावरच्या लघुउद्योगांनी वालदेवी प्रदूषित झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. (Waldevi river polluted due to illegal businesses industries)

वालदेवी नदी किनारी सध्या अनेक उद्योग वसलेले आहे. लॉन्ड्री चे कपडे धुण्यापासून तर गाडी धुण्यापर्यंत उद्योग रोज सुरू असतात. शिवाय या ठिकाणी आले, लसुण सोलण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यातील कचरा नदीमध्ये मिसळला जातो. शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे विकणारे कारागीर या नदीमध्ये अनेक वेळा माल धुऊन स्वच्छ करीत असतात.

रात्रीच्या वेळी अनेक वेळा या नदीमध्ये प्लास्टिक फेकले जाते. दारूच्या बाटल्या वेफर्सची प्लास्टिकची पाकिटे खरगटे अन्नपदार्थ कचरा सॅनिटरी नॅपकिन या नदीमध्ये फेकून ही नदी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. या ठिकाणी केमिकल मिश्रित उद्योग असल्याने वालदेवी जीर्ण होत चालली आहे. पाऊस येण्याआधी या नदीची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)

"आगामी अधिवेशनात आमदार महोदयांनी वालदेवीचा प्रश्न मांडला पाहिजे, कारण वालदेवी आपली आई आहे. नदीकिनारी असणारे लहान-मोठे उद्योग वालदेवी प्रदूषित करीत आहेत. केमिकल मिश्रित रसायने वालदेवीमध्ये मिसळून प्रदूषण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत उद्योगांचा सर्वे होऊन कारवाई व्हायला हवी." - उदय थोरात, पर्यावरण अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

Latest Marathi News Live Update : बीडमधील गेवराई शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक

पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

SCROLL FOR NEXT