Walpapadi, Ghevda, Green Chilli  esakal
नाशिक

Nashik Vegetable Market: वालपापडी, घेवडा, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा! नाशिक कृउबा समिती आवारात भाजीपाला आवक कमी

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ७ ते १२ एप्रिलदरम्यान वालपापडी, घेवडा व हिरव्या मिरचीची आवक कमी झाली

मुकुंद पिंगळे

Nashik Vegetable Market : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ७ ते १२ एप्रिलदरम्यान वालपापडी, घेवडा व हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. त्यामुळे दर वाढल्याचे दिसून आले. वालपापडी-घेवड्याची आवक पाच हजार ६४० क्विंटल झाली.

वालपापडीला प्रतिक्विंटल तीन ते चार हजार असा, तर सरासरी दर साडेतीन हजार रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल चार ते साडेसहा, तर सरासरी दर पाच हजार ७०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक २९१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल साडेपाच ते साडेसहा, तर सरासरी सहा हजार रुपये भाव होता. (Nashik Walpapadi Ghevda Green Chilli Price Revised marathi news)

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. उन्हाळ कांद्याची आवक १६ हजार ९६५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते एक हजार ५५१, तर सरासरी दर एक हजार ३०० रुपये राहिला. लसणाची आवक ४४९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल सहा ते १५ हजार, तर सरासरी दर ११ हजार रुपये राहिला.

बटाट्याची आवक आठ हजार ३७० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल एक हजार ६०० ते दोन हजार ४००, तर सरासरी दर दोन हजार २०० रुपये राहिला. गाजराची आवक ९७६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल दीड हजार ते ददोन हजार, तर सरासरी दर एक हजार ७०० रुपये दर राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते २२५, तर सरासरी १६०, वांगी १५० ते ३५०, तर सरासरी २६५, फ्लॉवर ३० ते १७० सरासरी १४० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ६० ते १३०, तर सरासरी ९० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळ्या मिरचीला २०० ते ३५० तर सरासरी दर ३०० रुपये असे दर प्रतिनऊ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ८० ते ३००, तर सरासरी २००, गिलके २०० ते ३५०, तर सरासरी २५०, दोडका २०० ते ३५० तर सरासरी दर ३०० रुपये असे प्रति १२ किलोस मिळाले. (latest marathi news)

फळांमध्ये केळीची आवक एक हजार १२३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते एक हजार ९०० तर सरासरी दर एक हजार ४०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक २३४ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते नऊ हजार ७०० तर सरासरी साडेपाच हजार रुपये दर मिळाला.

भाजीपाला प्रति १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

कोथिंबीर...१,३००...३,६००...२,५००

मेथी...१,५००...३,५००...२,६००

शेपू...१,०००...२,८००...१,८००

कांदापात...१,५००...३,५००...२,४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT