An antelope stuck in the drip irrigation pipes of the onion crop of farmer Ganesh Zalte of Katarwadi. esakal
नाशिक

Nashik Water Crisis: अन्न-पाण्यासाठी झुंजणाऱ्या काळविटांना ठिबकच्या नळ्यांचा फास! चांदवडच्या कातरवाडीतील घटना

Nashik News : अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती सुरु असताना एकमेकांमध्ये झुंजणारी दोन काळविटे ठिबक सिंचनाच्या नळीत अडकल्याची घटना चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

सोग्रस : सध्या अनेक ठिकाणी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. मुक्या जनावरांना त्याचा सर्वाधिक फटका बसू पाहत आहे. अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती सुरु असताना एकमेकांमध्ये झुंजणारी दोन काळविटे ठिबक सिंचनाच्या नळीत अडकल्याची घटना चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे घडली. (Nashik water scarcity Blackbuck tied with drip tubes Incident in Chandwad Katarwadi marathi news)

चांदवड तालुक्यात यंदा लवकर पाणीटंचाईचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. मानवी घटकांसोबत पशु-पक्ष्यांनाही दुष्काळी परिस्थितीचा फटका बसत आहे. कातरवाडी शिवारात अन्न-पाण्याच्या शोधात फिरत असताना शेतकरी गणेश झाल्टे यांच्या शेतात दोन काळवीटांमध्ये झुंज सुरु झाली.

बघताबघता दोन्ही काळवीटे कांदा पिकाला पाणी देण्यासाठी तयार केलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये अडकली. झुंज इतकी जोरात होती की ठिबकच्या नळ्या काळवीटांच्या शिंगात व गळ्यामध्ये अडकल्या अन्‌ चांगलीच फजिती झाली. घटनेची माहिती मिळताच येवला वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी काळवीटांच्या शिंगात व गळ्यात अडकलेल्या नळ्या काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. अथक प्रयत्नांनंतर काळविटांची सुटका करण्या वनविभागाला यश आले. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे झाल्टे यांच्या कांदा व ठिबकच्या साहित्याचे नुकसान झाले.

"पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे वन्यप्राणी आता मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहे. त्यामुळे थोड्याफार पाण्यावर घेतलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने ठिकठिकाणी पाणवठे तयार केल्यास नुकसान टळेल."- गणेश झाल्टे, शेतकरी, कातरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT