Farmer carrying fodder and onion leaves for animals. esakal
नाशिक

Nashik Water Crisis : पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण! देवळ्यात चाऱ्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना

Nashik News : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात आता दुष्काळाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मोठाभाऊ पगार

देवळा : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात आता दुष्काळाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर्षी ना खरीप हंगाम आला ना रब्बी हंगाम! त्यामुळे कोणतेच उत्पादन न आल्याने दुष्काळाची तीव्रता या आधीच्या दुष्काळाच्या मानाने अधिक आहे. या परिस्थितीमुळे खिशातला पैसा संपल्याने नाईलाजास्तव घरातील थोडेफार सोन्याचे दागिने तारण ठेवत वा मोडत पैसा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. (Nashik Farmers fighting to save livestock in deola news)

बँकांमध्ये सोने गहाण ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनाही सोने तारण योजना सुरू करीत व्याजदर परवडणारे ठेवले आहेत. खासगी सावकारांच्या तुलनेत बँकांचे वा आर्थिक संस्थांचे वार्षिक व्याजदर ९ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहेत.

जवळील सोने मोडले तर ते पुन्हा खरेदी करणे शक्य नाही अशी भावना असल्याने सोने तारण ठेवून पैसा उभारण्याकडे लोकांची पसंती आहे. काही नागरी बँका तसेच पतसंस्थांच्याशी चर्चा केली असता सध्या सोने तारण ठेवत कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. काही शेतकरी तर अक्षरशः चार-पाच ग्रॅम सोन्याचे दागिने आणत त्यावर कर्ज मागतात. त्यावेळी शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था किती बिकट आहे, हे लक्षात येते. (latest marathi news)

ग्रामीण भागात जिल्हा बँक आणि सोसायटींच्या माध्यमातून सहज कर्जपुरवठा केला जात असे. मात्र, आता तेथेही मर्यादा पडत असल्याने शेतकऱ्यांना पैसा उभा करणे अवघड झाले आहे. लग्नसराई, सणवार, आजारपण अशा अनेक बाबींसाठी पावलागणिक पैसा लागत आहे. याशिवाय शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार आहे.

"शेतकरी दाम्पत्य सोने तारण ठेवतात तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल होत असली तरी पैशांची निकड मोठी असते. अशा वेळी आम्ही कमीतकमी वेळेत शेतकऱ्यांना सुरक्षिततेची हमी देत सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देतो. सध्या तर दिवसाला १५-२० सोने तारण कर्ज प्रकरणे होतात."- नितीन बोरसे, व्यवस्थापक, देवळा मर्चंट्स को. ऑप. बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT