Amber Pawar of Pimpaldar left the cattle in the onion crop due to lack of water esakal
नाशिक

Nashik Water Crisis: पिंपळदर गाव परिसरात विहरी, कूपनलिका आटल्याने कांदा पिकात सोडली गुरे

Water Scarcity : गाव शिवारातील अनेक विहीरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या झालेल्या कांदा व इतर पिकात गुरे सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : पिंपळदर ता बागलाण गाव परिसरात भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शिवारातील पाण्याचे श्रोत विहरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी (Water Crisis) दिवसेंदिवस घटू लागल्याने शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेली पिके सोडल्याचे चित्र आहे.

गाव शिवारातील अनेक विहीरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या झालेल्या कांदा व इतर पिकात गुरे सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. (Nashik Water Crisis in Pimpaldar village area marathi news)

या वर्षी तीळवन, निरपूर, खमताने, पिंपळदर या भागात डोंगररांगाना लागून क्षेत्रात प्रजन्याचे प्रमाण कमी राहिल्याने या भागातील छोटे मोठे धरण, नाला बांध पावसाळ्यात देखील कोरडे राहिले. त्यामुळे या भाघातील कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होती.

त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी पुरेल या आशेवर कांद्याची लागवड केली होती. मात्र सध्या पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने अनेक शेतकऱ्यांनी दोन ते अडीच महिन्याची कांदा पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. पिंपळदर येथील शेतकरी अंबर रामा पवार यांनी आपला दोन ते अडीच एकर कांदा पिकात मेंढ्या सोडून दिल्या आहेत. (Latest Marathi News)

नवीन कुपनलिका केल्या तरी पाणी लागणार नही म्हणून पीकच सोडणे फायद्याचे ठरेल म्हणून पिकात मेंढ्या घातल्याचे त्यांनी सांगितले.जनावरांना पिण्यासाठी देखील टॅकंरचे पाणी विकत आणावे लागनार असल्याची भिती गावावर व शेतकऱ्यांवर येणार असल्याचे सांगितले.

पाण्याची कमतरता असल्यामुळे लागवड केलेला कांदा कमी पाण्यावर घेता यावा यासाठी ठिबक सिंचन, रेन पाईप, तुषार सिंचन, स्पिंकलर असा महागडा साधनांचा वापर करत मोठ्या प्रमाणात खर्च केला. पण फेब्रुवारीतच विहारींचे पाणी पूर्णतः आटून विहरी कोरड्याठाक झाल्याने लागवड केलेली दोन महिन्याची पिके होरपळून पिकात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. शासनाने दुष्काळ जाही करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे .

"माझ्या शेतात ४ विहरी असून आज त्या कोरड्या ठाक झाल्याने पाण्याअभावी सोडून दिलेल्या कांदा पिकात गुरे सोडण्याशिवाय पर्याय उरला नसून प्रचंड आर्थिक नुकसान होवून कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढत असल्यानं कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे."

- अंबर रामा पवार, कांदा उत्पादक शेतकरी, पिंपळदर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT