As soon as the tanker arrived, there was a rush from village to village to fill water, pouring water into the well.
As soon as the tanker arrived, there was a rush from village to village to fill water, pouring water into the well.  esakal
नाशिक

Nashik Water Crisis: पाणीपुरवठ्यासाठी दिवसाला दीड लाखाचा चुराडा! येवल्यात 77 वाड्या-वस्त्यांसाठी 45 टँकर अहोरात्र कार्यरत

संतोष विंचू

येवला : येवल्यातल्या साठवण तलावालगतच्या विहिरीवर टँकर भरायचे आणि दिवसा-रात्री अपरात्री २० ते ३० किलोमीटरवर असलेल्या गावांना पाणी पुरवायचे. जेव्हा गावात टँकर पाणी येईल तेव्हाच अनेकांची तहान भागली जात असल्याची भयावह स्थिती दुष्काळी येवल्यात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे रोज टँकरच्या ८५ खेपा होत असल्याने दिवसाला सुमारे दीड लाख रुपये अक्षरशः पाण्यावर खर्च होत आहे. (Nashik Water Crisis One half lakh per day for water supply wastage)

राज्यातील दुष्काळी नोंद असलेल्या ९४ तालुक्यांत येवल्याचे नाव अग्रस्थानी असून प्रत्येक उन्हाळा येथील जनतेला असह्य करणारा ठरत आहे. येथे पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने मागील वीस-पंचवीस वर्षांत एकीकडे लोकसंख्या वाढत गेली अन्‌ दुसरीकडे पाणीपातळी खालावत गेल्याने टंचाईची तीव्रताही वाढत आहे.

यंदा तालुक्यात फक्त ४२५ मिलिमीटर पाऊस झाला, संपूर्ण पावसाळ्यातच शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून गेली. त्यामुळे गेल्या वर्षी सुरु झालेले पाण्याचे टँकर भर पावसाळ्यातही सुरू होते. त्यातच वाढत्या उन्हामुळे उत्तर-पूर्व भागातील अवर्षणप्रवण गावात थेंबभर पाण्याचा पत्ता नसल्याने पाणीबाणी होऊन महिलांसह वयोवृद्ध पुरुष व मुलाबाळांनाही पाण्याचा शोध घ्यावा लागतो.

याचमुळे प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढत आहे. वाढत्या उन्हासोबत भूजल पातळी घटू लागल्याने हातपंप, बोअरवेल, विहिरी, पाणी योजनाही माना टाकू लागल्या असून टँकरग्रस्त गावात टँकरचे पाणीही अपुरे पडत असल्याने वादावादी सुरू आहे.

पालखेडचे आवर्तन आल्याने सध्या टँकर भरण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र टँकरची संख्या वाढल्याने अधिग्रहीत केलेल्या सात विहिरीवरून भरलेले टँकर गावोगावी रात्रीही पोचत आहेत. प्रत्येक गावात पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने नियोजन केले असून त्यानुसार पाणी योजनेत, वाड्यावर तसेच सार्वजनिक विहिरीतही पाणी देण्यात येते.

आज तब्बल ५२ गावे व २५ वाड्यांना रोज ४५ टँकरने पाणीपुरवठा सुरु असून रोज ८४ खेपांतून कुठे एक तर कुठे दोन खेपा पाणी पुरविले जाते. यासाठी रोज टॅंकर सुमारे एक हजार ६०० किलोमीटर प्रवास करत आहेत. सरासरी दीड ते दोन हजार रुपये एका टँकरचा रोज गृहीत धरला तरी दिवसाला दीड लाखाच्या आसपास टँकरवर खर्च होत असून विहीर अधिग्रहण तसेच वीजपंप खरेदी-दुरुस्ती, पाइप आदींचा खर्च वेगळाच होतो. (latest marathi news)

ग्रामीण भागात पाणीच नसल्याने शहरातील नांदूर विहीर तसेच अधिग्रहीत केलेल्या सात विहिरीवरून टँकर भरले जात असून येथून सर्वत्र पाणीपुरवठा होत असल्याने किलोमीटर वाढत आहे. अर्थात लाखो रुपये खर्चूनही नागरिकांची तहान भागत नसल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांची हाल कायम आहेत.

पाणीपुरवठ्याचा ताळेबंद

● पाणीपुरवठा होणारी गावे - ५२ । वाड्या - २५

● एकूण टॅंकर - ४५ / खेपा - ८४

● रोजचे अंतर - सुमारे १६०० किमी

● रोजचा खर्च - सुमारे १ लाख ७५ हजार

● अवलंबून लोकसंख्या - १ ते सव्वा लाख

● अधिग्रहीत विहिरी - नांदूर, धूत, पटेल, प्रज्वल पटेल, सुनील जाधव, पैठणकर, थळकर विहिरी

"टंचाईग्रस्त गावांना प्रशासनाने मागणीनुसार टँकर सुरू केले आहेत. मोठ्या गावातल्या वाड्यावर टँकरची मागणी वाढत आहे. नांदूरसह सात विहिरीवरून टँकर भरले जात असून अधिकाधिक टँकर वेळेत भरण्यासाठी नियोजन केले आहे. शिवाय नियमितपणे पाणीपुरवठ्यासाठी प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या सूचनांनुसार पूर्ण दक्षता घेतली जात आहे."- रफिक शेख, पाणीपुरवठा प्रमुख, पं. स. येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT