Dam (file photo) esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात 10 धरणे कोरडीठाक; अवघा 8 टक्के पाणीसाठा

Nashik News : सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३ धरणांपैकी तब्बल १० धरणे कोरडीठाक पडली असून, उर्वरित धरणांमध्ये अवघा ८.७१ टक्के साठा शिल्लक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनची जिल्ह्याला प्रतीक्षा लागलेली असताना दुसरीकडे दुष्काळाचे संकट गंभीर झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३ धरणांपैकी तब्बल १० धरणे कोरडीठाक पडली असून, उर्वरित धरणांमध्ये अवघा ८.७१ टक्के साठा शिल्लक आहे. नाशिकच नव्हे, तर मराठवाड्याचीही तहान भागविणाऱ्या सर्वांत मोठ्या गंगापूर धरणात पाण्याने तळ गाठला आहे. (10 dams dry in district)

जिल्हाभरातील टॅंकरची संख्याही ३९८ वर पोहोचली आहे. मॉन्सून लांबल्यास भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. जूनचे सात दिवस उलटून गेले आहेत. शेतकरी, सामान्य जनतेला मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही.

उन्हाळा अधिक तीव्र असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, नद्या, नाले, झरे आटून गेले. जमिनीची भूजल पातळी खालावली असून, हातपंपांनाही पाणी येत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आता धरणांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली.

जिल्ह्यात २४ प्रकल्प असून, गत आठवड्यात यातील १० छोटी-मोठी धरणे कोरडीठाक झालेली आहेत. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी २३.४३ टक्के, गौतमी गोदावरी १०.६५ टक्के, पालखेड ३३.०८ टक्के, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के, दारणा ४.२९ टक्के, भावली ० टक्के, मुकणे २.५९ टक्के, वालदेवी ० टक्के. (latest marathi news)

नांदूरमध्यमेश्वर ९८ टक्के, चणकापूर ४.५७ टक्के, हरणबारी ७.८० टक्के, केळझर ०.५२ टक्के, गिरणा १२.३५ टक्के, तर माणिकपुंज ० टक्के अशी काही महत्त्वाची धरणे मिळून ८.७१ टक्के असा साठा उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १८.५९ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सद्यस्थितीत ३६२ गावे व ९४१ वाड्या अशा एकूण एक हजार ३०३ गाव-वाड्यांना ३९८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय, तर ३८४ खासगी टॅंकरचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त असलेल्या ६४ गावांना तसेच १४३ ठिकाणी टॅंकरसाठी २१३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (५६), चांदवड (५), देवळा (३३), कळवण (२१), मालेगाव (५०), नांदगाव (१०), पेठ (१३), सुरगाणा (१४), येवला तालुक्यासाठी (६) विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

मालेगाव, येवल्यात टॅंकरचे अर्धशतक

तालुकानिहाय विचार करता आठवड्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मालेगाव व येवला तालुक्यांत टॅंकरने अर्धशतक पार केले असून, येथे अनुक्रमे ५६ व ५७ टॅंकरद्वारे तहान भागविली जाते. सिन्नर व बागलाण तालुक्यांतही टॅंकरची संख्या वाढत आहे. येथे अनुक्रमे ४२ व ४६ टॅंकर सुरू आहेत. चांदवड (३३), देवळा (३२), इगतपुरी (१६), नाशिक (१), पेठ (१६), सुरगाणा (१८), त्र्यंबकेश्वर (४) येथे टँकर सुरू आहेत. हे टॅंकर सात लाख १६ हजार ५०१ लोकांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT