Herds of herdsmen during migration to Kalwan area. esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : पाण्याअभावी मेंढपाळांचे कुटुंबासह स्थलांतर!

Nashik Water Scarcity : माळमाथा भागासह बागलाण तालुक्यातील अनेक गावातील मेंढपाळांची कुटुंबे बैलगाडीसह स्थलांतर करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : माळमाथा भागासह बागलाण तालुक्यातील अनेक गावातील मेंढपाळांची कुटुंबे बैलगाडीसह स्थलांतर करीत आहे. प्यायलाच पाणी नसल्याने चारा व पाण्याच्या शोधाथ सध्या खामखेडा, पिळकोस परिसरात कुटुंबकबिल्यासह दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी दुष्काळाची भयावह परीस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मुक्‍या जनावरांनाही पुढील तीन महिने पाणी व चारा मिळावा. (Nashik Water Scarcity Migration of shepherds with their families due to lack of water)

याकरीता माळमाथ्यावरील गावांतील मेंढपाळांच्या मेंढ्यांची चारा-पाण्यासाठी होत असलेली तडफड स्थलांतरापर्यंत येऊन पोहचल्याचे विदारक चित्र देवळा व कळवण तालुक्यात आलेल्या मेंढपाळांच्या जथ्याकडे पाहिल्यावर दिसत आहे. कळवण धरणांचा तालुका म्हणून ओळखला जात असल्याने या भागात जनावरांना चारा तर जाऊ द्या पण पाणी तर मिळेल.

या आशेवर सध्या कळवण तालुक्यातील गिरणा नदीकाठावरील व पुनंद नदीकाठावरील गावांमध्ये मालेगाव व बागलाण भागातील शेकडो मेंढपाळ आपल्या कुटुंबकबिल्यासह दाखल होऊ लागले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ बांधव आहेत. यावरच मोठ्या प्रमाणावर चरितार्थ चालत असल्याने चारा-पाण्याअभावी तडफड होत असल्याने तालुक्‍यात गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांच्या पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे.

मात्र, सध्या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे सर्व जलस्रोत कोरडेठाक पडल्याने रानावनात शेळ्या-मेंढ्यांना पाणी मिळणे मुश्‍किल झाले आहे. चार-चार, पाच-पाच किलोमीटरची पायपीट करून मेंढपाळ मुक्‍या जिवांची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भागातील अनेक मेंढपाळ गेल्या आठवडाभरापासून कळवण तालुक्यात मजल दरमजल करत डेरेदाखल होत आहेत. (latest marathi news)

परिस्थिती हाताबाहेर

खामखेडा, विसापूर, भादवन, चाचेर, लोहणेर, विठेवाडी, भेंडी, कळवण रस्त्यावर व परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवर मेंढपाळांचे जत्थे नजरेस पडत आहेत. आतापर्यंत कशीबशी मेंढ्यांच्या पाण्याची सोय त्यांनी केली.

पण, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मेंढ्यांची तहान भागविण्याचेच मोठे दिव्य असल्याने मालेगाव व बागलाण भागातील मेंढपाळांनी गिरणा नदीकाठावरील गावांकडे मोर्चा वळवला आहे. सध्या पिळकोस, बगडू, भादवन, विसापूर, बिजोरे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ डेरेदाखल होऊ लागली आहेत.

"चाऱ्या-पाण्याविना प्रचंड हाल होत असून, संपूर्ण कुटुंबासह पाण्यासाठी आम्ही शंभर ते सव्वाशे किलोमीटर स्थलांतर केले आहे. यावर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरे जगविणे, हेच आमच्यापुढे दिव्य आहे."- नथु खिल्लारी, मेंढपाळ, अमरावती पाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT