टूडे साठी
------------------
पाण्याचा उपसा वाढवला, ३० टँकरही तैनात
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पाणी पुरवठ्यात प्रतिदिन ३० दशलक्ष लिटरने वाढ करण्यात आली आहे. धरणांमधून दररोज ६१० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. त्याचबरोबर शहरात ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने सणासुदीत गृहिणींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी जलसंपदा विभागाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना आत्तापासूनच दहा टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेने अंमलबजावणी सुरु केली आहे. परंतू पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने तुर्त कपात बंद करण्यात आली असून दिवाळीनंतर दहा टक्के कपात केली जाणार आहे. मात्र दहा टक्के कपात सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात २५ टक्के पाणी कपात होणार आहे. गंगापूर, मुकणे व दारणा या तीनही धरण मिळून ५८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा पंपिंग स्टेशनद्वारे केला जातो. सध्या अतिरिक्त तीस दशलक्ष लिटर्स म्हणजेच एकूण सुमारे ६१० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा केला जात आहे. तीस दशलक्ष लिटर्सने पाण्यात वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली आहे.
---चौकट
टँकर वाढले
सिडको, जुने नाशिक भागात पाणी साठवण क्षमता कमी आहे. तसेच अनेक भागात विकासकामे सुरु असल्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होत आहे. दिवाळीनिमित्त पाण्याच्या मागणी वाढ झाल्याने एकीकडे धरणांमधून पाण्याचा उपसा वाढविण्यात आला, तर दुसरीकडे गरज असेल त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. शहरात ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.