नाशिक

धरण भरले तरी पाण्याची चिंता कायम

CD
टूडे साठी ------------ धरण भरले तरी पाण्याची चिंता कायम मृत पाणीसाठा उचलण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण काठोकाठ भरले असले, तरी भविष्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी चर खोदून मृतपाणी साठा उचलण्याचे नियोजन आहे. मात्र या कामासाठी काढलेल्या निविदेला दोन वेळा प्रतिसादच मिळाला नसल्याने आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण झाली होती. जुलैमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि ऑगस्टमध्येही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातून जायकवाडीकडे विसर्गही करण्यात आला. त्यामुळे नाशिकसह मराठवाड्याचा पाणीप्रश्नही सध्या तरी मिटला आहे. धरण भरले असले तरी भविष्यकालीन नियोजन म्हणून महापालिकेने धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव आणला आहे. गंगापूर धरण मातीचे असल्याने स्फोटकांचा वापर न करता विशेष तंत्रज्ञानाने खडक फोडून चर तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सल्लागार कंपनीने या कामासाठी ११ कोटी ६५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला होता. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर निविदा जारी करण्यात आल्या. पहिल्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एकही ठेकेदार पुढे आला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढताना धरणातील व भुयारी मार्गातील कामे करण्याची अट शिथिल करण्यात आली. तरीही दुसऱ्या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT