water cuts esakal
नाशिक

Nashik Water Cut : गंगापूर रोड, पंचवटी परिसरातील पाणीपुरवठा ठप्प

Nashik News : गंगापूर पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी केबल ब्रेक डाऊन झाल्याने बुधवारी (ता. १९) दुपारी तीनपासून वीज पुरवठा खंडित झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी केबल ब्रेक डाऊन झाल्याने बुधवारी (ता. १९) दुपारी तीनपासून वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी दोन तास पाणी उपसा बंद असल्याने त्याचा परिणाम पंचवटी व गंगापूर रोड भागातील पाणीपुरवठ्यावर झाला. वीज पुरवठ्याचे दोन तास व पुढे पाणी उपसा करण्यासाठी दोन तास असे चार तास पाणीपुरवठा खंडित झाला. (Water supply stopped in Gangapur Road and Panchavati area)

गुरुवार (ता.२०) पासून सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल असा दावा पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आला. १८ जूनला सातपूर विभागातील ध्रुवनगर येथे ५०० मिलिमीटर व्यासाची सिमेंट पाइपलाइन गळती झाल्याने बळवंत नगर, गणेशनगर, रामराज्य, जलकुंभ भरले नाही. त्यामुळे अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद होता.

त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील प्रभाग क्रमांक सात, आठ, नऊ व बारामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सिमेंट पाइपलाइन दुरुस्तीचे काम २३ तासानंतर पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. (latest marathi news)

मात्र बुधवारी दुपारी तीनला पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणारी केबल ब्रेक झाल्याने तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित झाला. पश्चिम विभागातील गंगापूर रोड, शरणपुर रोड, आनंदवली, सावरकर नगर या भागातील पाणीपुरवठा दुपारनंतर होऊ शकला नाही.

तर पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा न झाल्याने या विभागात पाणीपुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात आले. दोन तासानंतर केबल दुरुस्त होऊन वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर पाणी उपसा सुरू झाले व पुढे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचल्याचे यांत्रिकी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

SCROLL FOR NEXT