Modi, Amit Shah, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Fadnavis
Modi, Amit Shah, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Fadnavis esakal
नाशिक

Nashik Political News: जानेवारीत नाशिक ठरणार राजकारणाचे ‘हॉट डेस्टिनेशन’! ठाकरे- शिंदे जुगलबंदी दिसणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने राष्ट्राचे युवा धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करणार असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लगोलग शिवसंपर्क अभियान दौरा, तर गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची सहकार परिषदेला हजेरी, तसेच २३ जानेवारीला शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे अधिवेशन होणार आहे.

या नेत्यांच्या जोडीला त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते हजर राहणार असल्याने या तीनही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा व विधानसभा निवडणुका हाच अजेंडा राहणार आहे. त्यामुळे जानेवारीत राज्याच्या राजकारणात नाशिक हॉट डेस्टिनेशन राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. (Nashik will be hot destination of politics in January Thackeray Shinde rivalry ncp mns congress shivsena Political News)

२०२४ हे वर्ष निवडणुकांचे मानले जात आहे. एप्रिल व मे महिन्यात लोकसभा निवडणुका, तर ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे.

सत्ताधारी पक्षाला यश मिळाल्यास महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणूक वर्षात सर्वंच राजकीय पक्षांच्या दृष्टीने नाशिक महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे.

केंद्रात व राज्यात सत्तेतील भाजपने महाराष्ट्रात नाशिकचे मैदान प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी निश्‍चित केले आहे. २२ जानेवारीला अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची मुर्ती प्रतिष्ठापना होत आहे. भाजपच्या दृष्टीने सर्वात मोठा ऐतिहासिक सोहळा करण्याचे नियोजन आहे.

लोकसभा निवडणुकीत राममंदिर मुद्दा चर्चेचा होणार आहे व भाजपकडून चर्चेलादेखील आणला जाणार आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्राच्या रणभूमीत प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये जाहीर सभा घेत आहे.

नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर होणाऱ्या सभेत राष्ट्रीय युवा धोरणावर पंतप्रधान मोदी भूमिका मांडणार आहेत. हा एकप्रकारे प्रचाराचाच एक भाग आहे.

पंतप्रधानांच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. त्याचबरोबर पक्ष संघटनेचे देश पातळीवरील नेतेदेखील उपस्थित राहणार आहे.

दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष

दौरा व सभेचे नियोजन माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे मोदींचा दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी ४ जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा होत आहे.

एका विवाहाच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये येणार असून त्यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट इच्छुक आहे.

त्यामुळे श्री. पवार यांच्या दौऱ्यात नाशिकच्या जागेसंदर्भात तसेच विधानसभेच्या काही जागांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. २६ व २७ जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे.

मोदी यांच्यानंतर शहा यांची सहकार परिषदेच्या माध्यमातून होणारी भेट सहकार क्षेत्रावर भाष्य करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सहकारात पहिल्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील या क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाचे शक्तीप्रदर्शन

राज्याच्या राजकारणात पर्याय म्हणून उभा राहत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनदेखील निवडणुकांची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारीला नाशिकचा दौरा होत नाही, तोच दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक व शिर्डीच्या दौऱ्यावर येत आहे.

२३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा, तसेच जाहीर सभा होणार असून यात शिंदे सेनेला लक्ष्य केले जाणार आहे. या लक्ष्याला उत्तर देण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून २५ जानेवारीला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे

शिंदे सेनेसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. शिंदे सेनेला लोकसभा व विधानसभेची नाशिकची एक जागा हवी आहे. २२ व २३ जानेवारीला शिवसेनेचे अधिवेशन होत आहे.

१९९५ मध्ये नाशिकच्याच अधिवेशनाने ‘दार उघड बये दार उघड’ अशी हाक दिल्यानंतर शिवसेनेला भाजपच्या मदतीने सत्ता मिळाली होती. २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा नाशिकच्याच भूमीतून सत्तेची हाक दिली जाणार आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्येच एकमेकांसमोर येणार असल्याने उत्तर-प्रत्युत्तराचा सामना रंगणार असल्याने राज्याचे लक्ष शिंदे-ठाकरे दौऱ्याकडे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT