Winter  esakal
नाशिक

Nashik Winter Update: किमान तापमान 10.1 अंशांवर! पाऱ्यात घसरण, 27.5 अंश कमाल तापमानाची नोंद

यंदाच्‍या हिवाळी हंगामात अपेक्षित थंडी पडलेली नसल्‍याने नाशिककरांचा काही प्रमाणात हिरमोड झालेला होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दोन दिवसांपासून वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागला आहे. मंगळवारी (ता. २३) नाशिकचे किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, जळगावपाठोपाठ नाशिकचे किमान तापमान नीचांकी राहिले.

किमान तापमानातही घसरण झालेली असून, २७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. (Nashik Winter Update Minimum temperature below 11 degrees drop in mercury with maximum temperature above 27 degrees)

यंदाच्‍या हिवाळी हंगामात अपेक्षित थंडी पडलेली नसल्‍याने नाशिककरांचा काही प्रमाणात हिरमोड झालेला होता. एकदाच पारा दहा अंश सेल्सिअसखाली गेलेला आहे.

मात्र, पुन्‍हा पारा वाढल्‍याने वातावरणातून थंडी गायब झाली होती; परंतु वातावरणात वाहत असलेल्‍या थंड वाऱ्यामुळे गारवा जाणवू लागला होता.

सोमवारी (ता. २२) नाशिकचे किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस असताना, दीड अंशाची घसरण होऊन मंगळवारी किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

राज्‍यात जळगाव जिल्ह्या‍चे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस हे नीचांकी राहिले असून, त्‍यापाठोपाठ नाशिकमध्ये किमान तापमान नीचांकी राहिले. दिवसभर वातावरणात गारवा टिकून राहत असल्‍याने कमाल तापमानातही घसरण झालेली आहे.

सोमवारी कमाल तापमान २९.५ अंश सेल्सिअस असताना, मंगळवारी दोन अंशांची घसरण होऊन नाशिकचे कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

Shocking News : घरात धार्मिक कार्य, पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी तरुणीने खाल्ल्या गोळ्या, दुर्देवी मृत्यू

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

SCROLL FOR NEXT