Nashik Winter Update
Nashik Winter Update esakal
नाशिक

Nashik Winter Update : निफाड 5, तर नाशिकला 10.2 अंश सेल्सिअसची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : शहरासह जिल्ह्यात दुपारी उन्‍हाचा चटका बसत असला तरी, दुसरीकडे मात्र सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात बोचरी थंडी जाणवत आहे. जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घसरण नोंदविली गेली आहे. रविवारी (ता. २५) निफाडचे किमान तापमान पाच अंश सेल्सिअस, तर नाशिकचे १०.२ अंश सेल्सिअस ‍तापमान नोंदविले गेले. राज्‍यातील इतर मोठ्या शहरांच्‍या तुलनेत हे किमान नीचांकी तापमान ठरले आहे. (Nashik Winter Update marathi news)

काही दिवसांपासून तप्त उन्‍हामुळे ऐन फेब्रुवारीत कडक उन्हाचा अनुभव नाशिककर घेत आहेत. उन्‍हाचा तडाखा वाढल्‍याने तापमानाच्या पाऱ्यातही वाढ झाल्याने कमाल तापमानाने तीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलेला होता. मात्र काही दिवसांपासून वातावरणात वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे सायंकाळी थंडीची अनुभूती नाशिककरांना येत आहे.

एकीकडे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्‍त राहत असताना दुसरीकडे किमान तापमानात सातत्‍याने घसरण नोंदविली गेली आहे. शनिवारी (ता. २४) निफाडचे किमान तापमान ७.१ अंश सेल्सिअस नोंदविले असताना, त्‍यात दोन अंशांची घसरण होऊन रविवारी (ता. २५) किमान तापमान पाच अंश सेल्सिअस नोंदविले आहे.

तर नाशिकचे किमान तापमान शनिवारी १२.२ अंश सेल्सिअस असताना रविवारी त्यात दोन अंशांची घसरण होऊन ते १०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. दुसरीकडे कमाल तापमानात किरकोळ वाढ झाली असून, ३१ अंश सेल्सिअस इतक्‍या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील तीन-चार दिवस वातावरणात गारठा कायम राहाण्याचा अंदाज व्‍यक्‍त होत आहे. पुढील दोन दिवस मराठवाडा व विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला असून, याचा परिणाम स्‍थानिक वातावरणावरही पडण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

लासलगाव : तीन दिवसांपासून वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागला आहे. रविवारी (ता. २५) निफाड तालुक्याचे किमान तापमान पाच अंश सेल्सिअस नोंदविले गेले. निफाड तालुक्यातील किमान तापमानात रोज घसरण होत असल्याने ग्रामस्थ चांगलेच गारठले आहेत. उत्तर भारतात दोन दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे.

त्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. पुढील दोन दिवस गारठा कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरवात झाली होती.

मात्र, तीन दिवसांपासून पारा पुन्हा घसरला असून, तो पाच अंश सेल्सिअसखाली गेला आहे. थंड वाऱ्यामुळे चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. तापमानाची नोंद अशी : शुक्रवारी (ता. २३) : ८.४ अंश सेल्सिअस, शनिवारी (ता. २४) : ७.१ व रविवारी (ता. २५) : पाच अंश सेल्सिअस.(latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT