Nashik Winter Update : नाशिकमध्ये 2 दिवस पुन्हा गारठा

Winter Update : एकीकडे कमाल तापमानात सुधारणा होत असतानाच शुक्रवार (ता. २३)पासून अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Winter
Winter esakal

Nashik Winter Update : एकीकडे कमाल तापमानात सुधारणा होत असतानाच शुक्रवार (ता. २३)पासून अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा शेकोट्या पेटल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार पुढील २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवसांचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. (nashik winter update temperature dropped marathi news)

पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील, तसेच उर्वरित दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. गत बुधवार व गुरुवार निफाड येथील गहू कृषी संशोधन केंद्रावरील हवामान केंद्रावर तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र या दोन दिवसांत तापमान खाली घसरल्याने निफाड तालुक्यासह जवळच्या भागात अचानक थंडी जाणवू लागली.

Winter
Nashik Winter Update : निफाडला थंडीचा कडाका; पारा 7.4 अंशावर

शुक्रवारी येथील हवामान केंद्रावर हे तापमान ८.८ सेल्सिअस होते, तर शनिवारी ७.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. २६ फेब्रुवारीनंतर कोरडे व उष्ण हवामान लक्षात घेऊन उशिरा पेरलेल्या गहू, मका, ज्वारी व हरभरा, तसेच फळबागा व भाजीपाला पिकास पाण्याची पाळी द्यावी.

कोरडे हवामान लक्षात घेता बागायती हरभऱ्याच्या विविध वाणांची पक्वतेनुसार काढणी व मळणी करावी. नवीन लागवड केलेल्या फळझाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी, असा सल्ला विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या ग्रामीण कृषी मोसम हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. (latest marathi news)

Winter
Nashik Winter Update : निफाडला नीचांकी 5.6 अंश तापमान; द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com