helmet.jpg sakal
नाशिक

नाशिक : विनाहेल्मेट शासकीय कार्यालयात ‘नो एन्ट्री’

स्वातंत्र्यदिनापासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वातंत्र्यदिनापासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण हेल्मेट वापरत नसल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सक्ती आणखी कडक केली आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबरपासून शहरातील कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट ‘नो एन्ट्री’ असणार आहे. तसेच वाद घातल्यास संबंधितावर चॅप्टर केस करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्तांनी नाशिक शहरात स्वातंत्र्यदिनापासून शहरात हेल्मेटसक्तीचा नियम केला आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोलपंपावर विना हेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पण त्याची अनेक ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. उलट काही ठिकाणी पेट्रोल पंप चालकांशी वाद घालण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे आता हेल्मेट सक्तीचा निर्णय आणखी कडक करण्यात येणार आहे. यापुढे विनाहेल्मेट वाहनधारकांना पेट्रोलपंप परिसरात प्रतिबंध करण्यात येणार आहे. पेट्रोल पंपावर तसा ठळक फलक लावण्याचे आदेश आहेत.

कॉलेज, शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी

विना हेल्मेट शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी कोचिंग क्लास, पार्किंग, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, आदींसह शहरातील केंद्र व राज्य शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश नसणार आहे. पेट्रोलपंप चालकांना पंपावर सीसीटीव्ही लावण्याचा नियम सक्तीचा करण्यात

आला आहे. त्यामुळे महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. विना हेल्मेट शासकीय कार्यालयात प्रवेश केल्यास ८ दिवसांचा तुरुंगवास किंवा १२०० रुपये दंडाची शिक्षा केली जाणार आहे. विना हेल्‍मेट वाहनधारकाने वाद घातल्यास दुचाकीस्वाराविरोधात १९७३ फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, १०७ नुसार चॅप्टर केस केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT