death esakal
नाशिक

Nashik News : सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरुन उडी घेत महिलेने संपवलं जीवन

Nashik News : कुटुंबीयांनी नातेवाईक व परीसरात शोध घेतला असात मिळून आली नाही. आज ता. २९ सप्तशृंगी गडावर कुटुंबातील सदस्य मनिषा यांचा शोध घेेत असतांना शीतकडा परीसरातीस खोल दरीत महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा

वणी : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरुन दरीत उडी घेवून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असून वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Nashik woman ended her life by jumping from shitkada)

जाटपाडे ता. मालेगाव येथीस मनिषा योगेश जगताप, वय 35 वर्षे ही काल ता. २८ पासून घरातून बेपत्ता होती. याबाबत कुटुंबीयांनी नातेवाईक व परीसरात शोध घेतला असात मिळून आली नाही. आज ता. २९ सप्तशृंगी गडावर कुटुंबातील सदस्य मनिषा यांचा शोध घेेत असतांना शीतकडा परीसरातीस खोल दरीत महिलेचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.

याबाबत पोलिसांना माहीती दिल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ तसेच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने खोलदरीत असलेले महिलेचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन टीम यचे मंगेश केदारे , संकेत नेवकर, सागर गावित, कृष्णा जोपळे, नानाजी सोनवणे, ज्ञानेश्वर गावित, पराग कुलकर्णी आदींच्या दरीतून सदर महिलेस बाहेर काढले. (latest marathi news)

दरम्यान सदरची महिला ही मनिषा जगताप असल्याची खात्री झाली. दरम्यान शीतकड्याचा परीसर हा वणी पोलिस स्टेशन हद्दीत असल्याने वणी पोलीस ठाण्याचे पोलीस व नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने वाहनाने वणी ग्रामीण रुग्णालय वणी येथे मनिषा योगेश जगताप वय 35 वर्षे रा. जाटपाडे ता मालेगाव हिस घेवून आल्यानंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासुन मयत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT