Nashik women atrocition sakal
नाशिक

नाशिक : 'महिला' अत्याचारांची संख्या घटेना

महिला आयोगाच्या सदस्यांकडून नाराजी व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - जिल्ह्यामध्ये महिला अत्याचारासंदर्भात असलेल्या गुन्ह्यांचा निपटारा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सकारात्मक प्रयत्न होत असले तरी गुन्ह्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नसल्याची खंत राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि सदस्या तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव प्रवक्ता उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या विविध समित्यांची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन. डी, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलिस अधीक्षक ग्रामीण माधुरी कांगणे, पोलिस निरीक्षक ज्योती आमले, प्रकल्प अधिकारी अजय पडोळ आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती चव्हाण आणि श्रीमती रूपवते यांनी या वेळी सर्व महिला समित्यांच्या आढावा घेऊन त्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याकामी आयोगाकडून आवश्यक असलेली सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन श्रीमती चव्हाण यांनी या वेळी दिले. श्रीमती चव्हाण आणि श्रीमती रूपवते यांनी महिला बालकल्याण विकास अंतर्गत असलेल्या वन स्टॉप सेंटर समितीच्या कार्यालय, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय आदी ठिकाणी भेट देत सर्व महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत कामकाजाचा आढावा घेतला.

मध्यवर्ती कारागृहात भेट

महिला आयोगाच्या सदस्यांनी दुपारच्या सत्रात मध्यवर्ती कारागृहाला भेट देत महिला कैद्यांची भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि याबाबत महिला कैद्यांना उद्भवत असलेल्या समस्यांसाठी कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कारागृहातील महिला कैद्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कारागृह प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना देखील श्रीमती चव्हाण व रूपवते यांनी या वेळी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT