Women Police esakal
नाशिक

Nashik Women Police: गुन्हेशोध पथकांमध्ये दिसणार महिला पोलीस! पोलीस आयुक्तांचा आदेश; पुरुष मक्तेदारीला छेद

Nashik News : पोलिस ठाण्यांमध्ये महिला अंमलदारांची नियुक्ती असली तरी त्यांना महत्त्वाच्या जबाबदारी दिली जात नाही मात्र...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Women Police : पोलिस ठाण्यांमध्ये महिला अंमलदारांची नियुक्ती असली तरी त्यांना महत्त्वाच्या जबाबदारी दिली जात नाही. मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्यांअंतर्गत असलेल्या गुन्हेशोध पथकांमध्ये (डीबी) महिला पोलीस अंमलदारांचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस ठाणे व एका पोलीस चौकीच्या गुन्हेशोध पथकामध्ये महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Nashik Women police will seen in crime investigation team news)

पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हेशोध पथक असते. या पथकामार्फत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारींसह गुन्ह्यांची उकल, गुन्ह्यांचा शोध घेतला जातो. अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जात असते. या पथकामध्ये प्रामुख्याने पुरुष पोलीस अंमलदारांचीच मक्तेदारी राहिलेली आहे. आतापर्यंत गुन्हेशोध पथकात महिला पोलीस अंमलदारांचा समावेश केला गेलेला नव्हता.

मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महिला पोलीस अंमलदारांनाही पोलीस ठाण्यातील महत्त्वाच्या जबाबदारीची संधी मिळावी. त्यांनाही गुन्ह्यांचा तपास, शोध यांची माहिती व्हावी, यासाठी महिला पोलीस अंमलदारांना गुन्हेशोध पथकांमध्ये समाविष्ठ करण्याच आदेश पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस ठाणे आणि चुंचाळे पोलीस चौकी येथील कार्यरत गुन्हेशोध पथकामध्ये महिला पोलीस अंमलदारांचा समाविष्ठ करण्यात आलेले आहे.

"महिला पोलीस अंमलदारांनाही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हेशोध पथकांत महिला अंमलदारांची नियुक्ती केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी अपेक्षा आहे."- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

यांचा ‘डीबी’त समावेश (कंसात पोलीस ठाणे)

- वैशाली महाले (आडगाव), रोहिणी भोईर (पंचवटी), शुभांगी आवारे (म्हसरुळ), सोनाली काटे (सरकारवाडा), सोनम कातकाडे (भद्रकाली), कविता महाले (मुंबईनाका), अश्विनी खांडवे (गंगापूर), दिव्या देसले (सातपूर), अश्विनी भोसले (अंबड), अश्विनी पगार (इंदिरानगर), मयुरी विझेकर (उपनगर), संध्या कांबळे (नाशिकरोड), आर. एच. खाकले (देवळाली कॅम्प), दीपाली खर्डे (चुंचाळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT