Onion auction going on in the evening at Bazar Samiti. esakal
नाशिक

Nashik Onion Export : 35 दिवसानंतर कांद्यावर लागली दराची बोली; येवल्याच्या बाजार समितीत दराचा 2 हजारांचा टप्पा पार

Nashik News : तब्बल ३५ दिवसानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाले. कांदा लिलाव सुरु झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ वृत्तसेवा

येवला : तब्बल ३५ दिवसानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाले. कांदा लिलाव सुरु झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी कांद्याच्या दराने दोन हजाराचा टप्पा पार केला असून सरासरी १ हजार ७०० रुपये दर उन्हाळ कांद्याला मिळाला आहे. (Yeola After 35 days onion auction started in Agricultural Produce Market Committee)

पणन विभागासह शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवत प्रथमच व्यापारी व मापारी- हमाल यांच्या वादात ३५ दिवस कांदा लिलाव बंद राहिला. दरवर्षीप्रमाणे मार्चअखेरमुळे २८ मार्चपासून बाजार समिती बंद होत्या. पहिल्या आठवड्यात लिलाव सुरू होणार तोच चार एप्रिलपासून जिल्ह्यात लेव्हीच्या मुद्द्यावर बाजार समिती बंद झाल्या.

तेव्हापासून तर आजपर्यंत येवला बाजार समितीत लिलाव बंद होते. मध्यंतरी दोन दिवस बाजार समितीला लिलाव सुरू करण्यात यश आले. मात्र हमाल- मापारी व शेतकऱ्यांची वादावादी झाल्याने पुन्हा हे लिलाव ठप्प झाले आहेत. ‘नो वर्क नो वेजेस’ याची अंमलबजावणी व्हावी म्हणून व्यापारी वर्ग आग्रही आहे तर हमाली, तोलाई व वाराई कपात न करण्याची व्यापाऱ्यांची भूमिका होती. यामुळे ३५ दिवस लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

लिलाव सुरळीत

बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, उपसभापती बापूसाहेब गायकवाड, सचिव कैलास व्यापारे, व्यापारी संचालक नंदकुमार अट्टल व भारतशेठ समदडिया, व्यापारी असोसिएशनचे नेते रामेश्वर कलंत्री, मापारी संचालक अर्जुन ढमाले तसेच मापारी नेते भानुदास जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व नेत्यांनी एकमताने पुढाकार घेऊन शेतकरी हितासाठी शनिवार (ता.४) पासून लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

त्यानुसार बाजार समितीच्या आवारात सुरळीत लिलाव पार पडले. लिलावातून हमाली घ्यायची या पहिल्या निर्णयाप्रमाणेच तडजोड होऊन रोख स्वरूपात पैसे देण्याच्या निर्णयावर सहमती झाल्याने लिलाव सुरू झाले.

सहा हजार क्विंटल कांदा आवक

येथील बाजार समिती पहिल्या दिवशी सुमारे ४०० पिकअप व ट्रॅक्टर मधून सहा हजार क्विंटलवर उन्हाळ कांद्याची आवक झाली. यास ५०० ते २०१५ व सरासरी १७०० रुपये बाजारभाव मिळाला. लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून लिलाव बंद पडू देऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली. गेल्या महिन्यात अंदाजे २ लाख क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. यामुळे सरासरी दर प्रतिक्विंटल १२०० रुपये धरला तरी २८ ते ३० दिवसांत २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

"सर्व घटकांचे एकमत झाल्याने आजपासून कांदा लिलाव सुरळीत झाले. पहिल्याप्रमाणेच आम्हाला तोलाई घ्यायची आणि रोख स्वरूपात पैसे द्यायचे यावर दोन्ही बाजूने एकमत झाले. कांद्याला दोन हजाराचा टप्पा पार झाला असून सतराशे रुपये सरासरी दर मिळाला." - कैलास व्यापारे, सचिव,बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT