Crop Insurance  esakal
नाशिक

Crop Insurance : दुष्काळातही मिळेना पीक विमा रक्कम! केंद्रीय समितीने दुष्काळ जाहीर करूनही परिणामशून्य

Nashik News : येवले तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या सायगाव सह सर्वच ठिकाणी २०२३ च्या खरीप हंगामात पावसाअभावी सर्वच पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

सायगाव : येवले तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या सायगाव सह सर्वच ठिकाणी २०२३ च्या खरीप हंगामात पावसाअभावी सर्वच पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्रीय स्तरीय समितीने दुष्काळ जाहीर करूनही पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Despite declaring drought by central level committee no crop insurance)

पाऊस अत्यंत कमी पडल्याने मका, बाजरी, कापूस, मूग कोणतीच पिके हाती लागली नाहीत. काही पिकांची अवस्था अशी झाली की ती सोंगणीलाही महाग झाली. चाराटंचाईने पशुधन सांभाळणेही जिकरीचे झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तर अनेकांना वर्षभर टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा स्थितीत केंद्रीय पथकाने पाहणी करून दुष्काळ जाहीर केला.

यासाठी शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर झाल्या. केंद्र शासनाने दुष्काळ अनुदान म्हणून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे दिले. पण पिकांचे जे मोठे नुकसान झाले त्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता ही शेतकऱ्यांना मिळालेले हे पैसे पुरेसे नाहीत. (latest marathi news)

तरिही पीक विम्याचे पैसे मिळून येणाऱ्या खरीप हंगामासाठी मोठी मदत होईल, ही शेतकऱ्यांना आशा होती. पण खरीप हंगाम तोंडावर आला असूनही पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हताश होऊन ठिकठिकाणी चौकशी करत आहे. पैसे कधी मिळणार याचे उत्तर कोठेच मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तालुक्यातील काही महसूल मंडलात पंचवीस टक्के अग्रिम पैसे मिळाले पण पुढील पैसे मिळाले नाहीत. नगरसूल महसूल मंडलात सायगावसह अनेक गावे आहेत. येथील कोणत्याच शेतकऱ्यांना तर अग्रिमचेही पैसे मिळालेले नाहीत. तरी दुष्काळात पीकविमा शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार असल्याने संबंधित विभागाने लक्ष देऊन लाभ मिळवून देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे सुरेश जेजुरकर, सुदामराव भालेराव, वसंतराव खैरनार, रत्नाकर भालेराव सह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT