The team searching for the drowned youth in the river here. esakal
नाशिक

Nashik News : गिरणार नदीपात्रात तरुण बुडाला; अंधार पडल्याने शोधकार्य थांबविले

Nashik : नदीपात्रात अंदाजे २० वर्षीय तरुण नदीत बुडाला असून, स्थानिकांच्या मदतीने दुपारी सव्वाचारपासून सुरू असलेले मदतकार्य अंधार पडल्याने थांबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खामखेडा-भऊर गावाला जोडणाऱ्या गिरणा पुलाजवळील नदीपात्रात अंदाजे २० वर्षीय तरुण नदीत बुडाला असून, स्थानिकांच्या मदतीने दुपारी सव्वाचारपासून सुरू असलेले मदतकार्य अंधार पडल्याने थांबविण्यात आले. गिरणा नदीपात्राला सद्यस्थितीत आवर्तन सुरू असून, अनेक मेंढपाळ नदीकाठी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी नदीपात्रात येत असतात. शनिवारी (ता. १)ही काही मेंढपाळ भऊर-खामखेडा गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी आले होते. (Young man drowned in Girnar riverbed )

दुपारी चारच्या दरम्यान रवी सीताराम खाताळ (वय २०, रा. वाघापूर, ता. साक्री, जि. धुळे) हा काठावर अंघोळ करून कपडे धुण्यात व्यस्त होता. कपडे धूत असताना त्याच्या हातातील बनियन नदीत पडला व तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. बनियन धरण्यासाठी हा तरुण नदीपात्रात पुढे गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. जवळ उभ्या असलेल्या त्याच्या नातलगांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.

खामखेडा गावातील एका व्यक्तीने ही घटना सरपंच वैभव पवार यांना सांगितल्यावर लागलीच गावातील पोहणाऱ्या तरुणांनी नदी गाठली. पोलिस व महसूल प्रशासनाला घटनेची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने पवार यांनी मदतकार्य सुरू केले. गावातील अनेक तरुणांनी प्रयत्न करूनही त्यात यश न आल्याने ‘वसाका’ येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावण्यात आले. मात्र, पाणी पातळी खोल असल्याने सायंकाळी सातपर्यंत तरुणाचा शोध लागला नाही. अंधार झाल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली.

आज पुन्हा शोधमोहीम

देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर येथील स्कुबा ड्रायव्हिंग, सायखेडा, मालेगाव येथील पथकाशी संपर्क केला असून, रविवारी (ता. २) पुढील शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. देवळ्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे व त्यांची टीम घटनास्थळी लक्ष ठेवून होती. मंडल अधिकारी मनोहर गांगुर्डे हेही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT