death file photo esakal
नाशिक

Nashik News : जायखेड्याच्या युवकाने ताहराबाद येथे उचलले टोकाचे पाऊल

Latest Nashik News : एक दिवस आधी या युवकावर अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी जायखेडा पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

जायखेडा : येथील अभिजित संजय मोहिते (वय १७) या युवकाने ताहाराबाद येथे नातेवाईकाच्या घरी फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. एक दिवस आधी या युवकावर अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी जायखेडा पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (youth of Jaikheda took extreme step in Tahrabad)

जायखेडा येथील नववसाहतील घराजवळ राहणाऱ्या मुलीला त्रास देत असल्याचा कारणावरून मुलीच्या व मुलाच्या पालकांमध्ये मंगळवारी (ता. ८) भांडण व हाणामारी झाली होती. या नंतर दोघांनी जायखेडा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. मुला विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी हाणामारीच्या गुन्ह्यात मुलाच्या वडिलांना अटक केली होती. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते. तो ताहाराबाद येथे रात्रभरासाठी नातेवाइकांकडे गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी माझ्या मृत्यूस मुलीचे आई-वडील जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून सकाळी त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. (latest marathi news)

घटनेनंतर मुलाच्या नातेवाइकांनी संशयितांना अटक करण्याची मागणी करीत दिवसभर जायखेडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. अखेर संशयितांना अटक केल्यानंतर मृत युवकावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांवर आरोप

नातेवाइकांनी या प्रकरणी पोलिसांवर दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा लेखी आरोप केल्याने खळबळ उडाली होती. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी या संदर्भात सखोल चौकशीचे लेखी आश्वासन युवकाच्या नातेवाइकांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT